वादळी नजरेतून – पंचनामा
वादळी नजरेतून – पंचनामा
मला दुःख आहे ते फक्त फासावर
लटकणार्या शेतकऱ्यांच
बंदूकीच्या गोळ्याना बळी पडणाऱ्या जवानांचे
अर्धेपोटी अन कुपोषित मृत्यू होणाऱ्या बालकांच
बलात्काराची शिकार होणाऱ्या अजान मुलींच
वृध्द असूनही वासनेने सैराट झालेल्या विकृतांच
महिलांना अमानवी वागणूक देणाऱ्या पुरुष संस्कृतीच
राष्ट्र संत म्हणवून घेत लिंगपिसाट वागणारया भोंदुंच
हजारो लाखो कोटी रुपयांची लूट करणाऱ्या मल्ल्यांच
अन तथाकथित उद्योगपतिंचे
शेतकऱ्यांना माती देणाऱ्या राज्यकर्त्यांचे
जाती जातीत संघर्षाचा अग्नि पेटवनार्या धर्मांध शक्तींच
पैशाने मतं विकत घेणाऱ्या संधिसाधुंच
व्यसनांधीन तरुण पिढीच
लोकशाहीचा पंचनामा करणाऱ्या
तथाकथित राजकीय पक्षांच
तरुणांच्या स्वप्नं आशा अपेक्षा यांना
सुरुंग लावणाऱ्या नेत्यांच
काहींच न करता फक्त भ्रष्टाचार
प्रोत्साहित करणाऱ्या यंत्रणेच
किती खाल्लं तरी भूक भागत नाही अशा प्रवृत्तीच
एकूणच माणूस असूनही
पशुला लाजवणारया माणसाच
तथापी मी झगडतो आहे लढतो आहे
सत्यमेव जयतेसाठी “!
आनंद कोठडीया , जेऊर ,९४०४६९२२००
