पुरोगामी महाराष्ट्रातील लाजिरवाण्या घटनेचा बीआरपीकडून निषेध

पुरोगामी महाराष्ट्रातील लाजिरवाण्या घटनेचा बीआरपीकडून निषेध BRP protests shameful incident in progressive Maharashtra

माळेवाडी घटनेच्या निषेधार्थ बहुजन रयत परिषदेकडून आंदोलनाचा इशारा – माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष नागेश यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास निवेदन

    पंढरपूर/प्रतिनिधी - पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगांव येथे घडली आहे. दलित मागासवर्गीय मयत व्यक्तीवर गावातील जातीयवादी लोकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्याने सबंध महाराष्ट्रात या घटनेचा निषेध केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी पंढरपूर येथे बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष नागेश यादव यांच्या नेतृत्त्वाखाली तहसिलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष अँड. किशोर खिलारे,दलितमित्र दुर्योधन यादव,अँड. बादल यादव,नाथा यादव,युवक नेते लोकेश यादव, प्रसाद यादव,यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 यावेळी माळेवाडी येथील घटनेचा निषेध करुन आरोपीस दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार व मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करण्यात यावे, साठे कुटुंबीयांना शासकीय मदत करून पुनर्वसन करण्यात यावे, सदर पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी प्रशासनास दिला आहे .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: