उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२३ –राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मु्द्दा पेटला आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी केलीय. मात्र राज्य सरकारने तसं करु नये, यासाठी ओबीसी समाजाकडून राज्यभर आंदोलन सुरु करत सरकार वर दबाव आणला आहे. याच मुद्द्यांवरुन ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री आणि नेते या बैठकीला हजर होते. यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात ओबीसींच्या मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात ओबीसींच्या मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: