कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मणार्थ मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया

कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मणार्थ मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया Free Eye Examination, Cataract Surgery in Memory of Late Sudhakar Pant Paricharak

पंढरपूर – पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच व राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या प्रथम पुण्यस्मणार्थ घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच महिलांसाठीमोफत कर्करोग तपासणी शिबीर तालुक्यातील ८ आरोग्य केंद्र आणि करकंब ग्रामीण रुग्णालय असे मिळून ९ ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्याचा सांगता समारंभ झाला .

यावेळी संबंध तालुक्यातुन एकूण 1698 रुग्णांची नेत्र तपासणी झाली असून त्यापैकी 459 इतके रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.

 शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी पांडुरंग परिवारातील जेष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी, मार्गदर्शक आणि डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ आणि तालुक्यातील तरुण सहकारी मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: