शेतीपंपाची विज तोडणी थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू – स्वाभिमानी चा इशारा

शेतीपंपाची विजतोडणी थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू – स्वाभिमानी चा इशारा Stop disconnecting agricultural pumps, otherwise take to the streets – a warning of Swabhimani Shetkari Sanghtna
  पंढरपूर - महावितरणकडून थकीत वीजबिलासाठी शेतकर्यांच्या शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडणी केली जात आहे यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट दुसरीकडे पिके,फळे व भाजीपाला यांना दर नाही यामुळे शेतकरी हवालदिल असतानाच महावितरण कडून वीज कनेक्शन तोडुन शेतकर्यांच्या अडचणीत भर टाकण्याचे काम केले जात आहे. महावितरणच्या या त्रासदायक धोरणामुळे शेतकर्यांमध्ये महावितरणविषयी संतप्त प्रतिक्रिया आहेत. 

 येणार्या काळात शेतकरी महावितरण विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल व होणार्‍या नुकसानीस महावितरण जबाबदार असेल असेही या निवेदनात म्हटले आहे. स्वाभिमानीच्या वतीने तालुका कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.महावितरणच्या वतीने श्री.काळभोर यांनी हे निवेदन स्विकारले. 

 यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल म्हणाले "महावितरणकडून शेतकरी वर्गाला अडचणीत आणण्यात येत आहे. याबाबत शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी असुन महावितरणने वीज कनेक्शन पुर्ववत न केल्यास दोन दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल" असा इशारा बागल यांनी दिला.

 यावेळी स्वाभिमानीचे शाहजान शेख,रणजित बागल, कांताभाऊ नाईकनवरे,सचिन आटकळे,बाहूबली सावळे,नवनाथ मोहिते,दत्तात्रय पाटील, यशवंत बागल,मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: