जिनेंद्राची वाणी म्हणजे जिनवाणी -परमपूज्य स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पटाचार्य महास्वामीजी
कोगनोळी जैन मंदिराला भेट
कोगनोळी ,जि.बेळगावी, दि.29 : भगवंतांच्या वाणीला प्रवचन म्हटले आहे.मनामध्ये कोणतीही वाईट भावना ठेवणे, शोडकरण फार महत्त्वाचे आहे. तीर्थंकर प्रकृती साधी नाही. जिनवाणीमध्ये सांगितले आहे तसे राहिल्यास रोगमुक्त होतो. जिनवाणीमध्ये पद्मपुराण वाचले पाहिजे. जिनेंद्र भावना अतुट असली पाहिजे मनात अहंकार असू नये, अहंकार जीवनातून नष्ट झाला पाहिजे. अहंकार नरकात नेतो तर नमो जिनेंद्र स्वर्गात मोक्षात नेतो, क्रोध माया यामुळे भरकट राहिलो आहे. जिनेंद्राची वाणी म्हणजे जिनवाणी आहे असे प्रतिपादन नांदणी संस्थान मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पटाचार्य महास्वामीजी यांनी केले.
कोगनोळी ता. निपाणी जि.बेळगावी येथील 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.
डॉ.अंकित उपाध्ये यांनी स्वागत करुन महाराज यांचा परिचय करून दिला. पंकज पाटील यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले.
विरकुमार पाटील म्हणाले, कोगनोळी जैन मंदिराला परंपरा आहे. मंदिर पुराण काळातील असून उत्खनणातून प्रकट झाले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. भट्टारक पट्टाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे काम सुरू रहाणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील,पद्मा पाटील, संजय खोत, राजगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, के डी पाटील, बापूसो पुणेकर, तात्यासाहेब कागले, रमेश शेटे, एल डी चौगुले, रमेश पाटील, राजगोंडा चौगुले, राजेंद्र चौगुले, प्रवीण मगदूम, पोपट कोथळीकर, सुनिल पाटील, राजश्री पाटील, अरुणा पाटील, सविता पाटील, शरयु पाटील, धनंजय पाटील, प्रदिप पाटील, उदय मोनाप, अनिल चौगुले यांच्यासह अन्य श्रावक श्राविका उपस्थित होते.