आर्थिक अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिले भरण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक – आ. संजयमामा शिंदे

शेती पंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करणेबाबत आ. संजय शिंदे यांचे ऊर्जामंत्री यांना पत्र Regarding restoration of power supply to agricultural pumps. Sanjay Shinde’s letter to the Energy Minister
  कुर्डूवाडी/ राहुल धोका- करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांचा शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करावा अशा मागणीचे पत्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेले आहे.
आर्थिक अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिले भरण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक
        या पत्रामध्ये ते म्हणतात की ,महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही तसेच वीज बिले सुद्धा दिलेली नाहीत.वीज बिले वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे विद्युत कनेक्शन तोडले आहे.त्यामुळे ऊस,केळी,डाळिंब, द्राक्ष यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतातील उभी पिके जळू लागलेली आहेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न,लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे . यापूर्वी शेतकऱ्यांनी मार्च 2021 मध्ये शेतीपंपाची वीज बिले भरलेली आहेत.  शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकांना भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिले भरण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे. 

    तरी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शेती पंपाचा विद्युतपुरवठा पूर्ववत करण्या बाबत संबंधित विभागास आदेश देण्यात यावे अशी मागणी आ.संजय शिंदे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: