स्वेरीत ऑनलाईन लोगो डिझाईन स्पर्धा संपन्न online logo design competition held in SVERI
पंढरपूर- गोपाळपूर ,ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॉम्प्युटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या आयकॉन कमिटी व इन्स्टिट्यूशनल इनोव्हेशन कौन्सिल (आय.आय.सी.) तर्फे ऑनलाइन पद्धतीने लोगो डिझाईन स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.सोमनाथ ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली आयकॉन व आय.आय.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोगो डिझाईन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पंढरपूर मधील वेदांगी भुजंग यांनी प्रथम क्रमांकाचे रु.एक हजारचे बक्षीस तर नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, पुणे येथील सलोनी वानखडे यांनी उपविजेतेपद पटकावत रु. सातशेचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषक पटकावले. हा कार्यक्रम गूगल मीट अँप द्वारे संपन्न झाला . या कार्यक्रमाचे ‘फेसबुक लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुणे आणि सोलापूर विद्यापीठातील एकूण ४० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बौद्धिकतेचा वापर करून अनेक कल्पक व नाविन्यपूर्ण लोगो तयार केले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.प्राजक्ता सातारकर यांनी काम पहिले.
स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. सातारकर म्हणाल्या,अशा स्पर्धांत्मक कार्यक्रमां मुळे मुलांमधील कल्पनाशक्तीला आणि अंगीकृत कला गुणांना वाव मिळतो.
यावेळी स्पर्धेवर मनोगत व्यक्त करताना विभाग प्रमुख डॉ. ठिगळे म्हणाले की, ‘स्वेरीद्वारे भरवलेली ही स्पर्धा विकासाच्या दृष्टीने विशेष मेजवानी होती. विद्यार्थ्यांना अशा ऑनलाइन स्पर्धांमधून अधिक चालना मिळते आणि सध्याच्या युगात अद्ययावत माहिती मिळवता येते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी समन्वयक अक्षय माने, रोहित कवितके, राहूल हिंगमिरे, वैष्णवी जठार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी प्रा.पी.जी. गायकवाड, प्रा.एस.एस कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन वैष्णवी जठार यांनी केले.आयकॉनचे शिक्षक समन्वयक प्रा.गायत्री सरदेशमुख यांनी आभार मानले.
Like this:
Like Loading...