तिसरा डोळा, वास्तव : बोध अन छेद
तिसरा डोळा :
जे जोडतात अन तोडतात देखील तेच
शब्द असतात ते सुखवणारे नसले तरी
दुखवणारे नसावेत
ते सत्तेची पूजा करणारे असण्यापेक्षा
सत्याचे पुजक असावेत
विकाराऐवजी विवेका जन्म देणारे असावेत
वैर निर्माण करण्यापेक्षा
प्रेम स्नेह निर्माण करणारे असावेत
अंधश्रद्धेची मशागत करण्याऐवजी
कारणांचा शोध घेणारे असावेत
वास्तव : बोध अन छेद ….
ते म्हणाले “आभाळच फाटलय
ठिगळ कुठे कुठे लावायाचे ?”
मी तात्काळ उत्तरलो “अहो हे खरं आहे
म्हणून का घरी बसायचे ?”
का घरी कण्हत कण्हत जगायचं ?”
जेवढं करता येईल तेवढं करत जायचे”!
तेंव्हा ते पुन्हा म्हणाले
यांन काय होणार ?
तेंव्हा मी त्या॑नाच विचारले
“हजारो मैल चालायचं त्याची
सुरवात पहिल्याच पावलाने होते ना ?
थेंबा थेंबानेच समुद्र होतो हे खरे ना ?
मग निराश कशाला व्हायचं ?
जेवढं जमेल तेवढं केलं तर ते का नाही करायच ?
तेंव्हा ते म्हणाले, हे दृष्टी देणार आहे
अखेर मी म्हणालो हजारो वर्षाचा अंधार
एक ज्योत क्षणांत घालवते
मग आपण का गप्प बसायचे ?
जमलं तेवढं करत जायचं !!
आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००
