एका जातीपुरता मर्यादित पक्ष समजू नका, रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मियांचा पक्ष ठरला आहे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

एका जातीपुरता मर्यादित पक्ष समजू नका, रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मियांचा पक्ष ठरला आहे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Don’t think of a party limited to one caste, Republican party has become a party of all castes and religions – Union Minister of State Ramdas Athavale

नागपुरात 9 ग्रामपंचायतींचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

नागपूर,दि.26/08/2021- भंडारा आणि नागपूर मधील ज्या 9 ग्रामपंचायतींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. त्यांच्या या निर्णयाने रिपब्लिकन पक्षाची एकजातीय प्रतिमा पुसली गेली आहे. गावातील एका जातीपुरता मर्यादित रिपब्लिकन पक्ष गावातील सर्व जाती धर्मियांचा पक्ष झाला आहे. जातीपतीच्या भिंती ओलांडून सर्व जाती धर्मियांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष संपूर्ण भारतात वाढत आहे,असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

    नागपूरमधील मौदा येथे धनजोडे सभागृहात भंडारा आणि नागपूर मधील 9 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच आणि सर्व विजयी पॅनल सह सर्व सदस्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन येथील रिपाइं चे युवा नेते आशिष बुराडे यांनी केले होते.यावेळी विचार मंचावर रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर,भीमराव बनसोड, बाळू घरडे, विजय गुप्ता,राजन वाघमारे, भावेश तण्णा आदी उपस्थित होते.

  सर्वांना साथ आणि सर्वांचा विकास करण्याचे उद्दिष्ट्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे.गावागावाचा विकास करण्यास मोदी सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकार च्या जनधन योजना, आयुष्यमान भारत,उज्वला,मुद्रा आदी अनेक योजना प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहोचवा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. 

यावेळी पहेला ग्रामपंचायतचे सरपंच सौ मंगला ठवकर , निमगाव ग्रामपंचायतच्या सरपंच शिलाताई राऊत , गोपीवाडाचे सरपंच विनायक टांगले , मेहेगावचे सरपंच दिलीप लांजेवार , कर्कापूर चे प्रल्हाद आगाशे, बिनाखी चे संतोष बघेले; जाम्ब चे विलास बारई;  काटी चे विनोद बाभरे; देऊळगाव चे अर्जुन उईके या सर्व सरपंचांचा त्यांच्या ग्रामपंचायतींनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केल्याबद्दल ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: