सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा जैन समाजाच्यावतीने सन्मान
सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा जैन समाजाच्या वतीने सन्मान Police Commissioner Ankush Shinde honored on behalf of Jain community
सोलापूर / संदेश गांधी : – सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा जैन समाजाच्यावतीने सन्मान करण्यात आला. सुमेरकुमार काले (जी .एस .टी जॉईंट कमिशनर नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक – अध्यक्ष मिहीर गांधी, अकलुज. तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र उपाध्यक्ष, उद्योजक अनिल जमगे, डॉ. सतीश वळसंगकर, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष शाम पाटील, उद्योजक गिरीश दर्बी, सैतवाळ महासंघाचे अध्यक्ष रवींद्र कटके, प्रा.मनिष शहा , संदेश गांधी, भिमानगर हितेश दोशी, सुरेंद्र दोभाडा आदी जैन समाजातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जैन समाजाने कोविड काळात खुप मोठे काम केल्यामुळे अनेक सामान्य कुटुंबांना त्यांचा आधार मिळाला, असा उल्लेख केला. सोलापूर मधील कार्य काळातील आठवणी ना उजाळा दिला. असेच त्यांचे कार्य निरंतर राहो हीच सदिच्छा जैन समाजाच्यावतीने दिली.