मुलताईत दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, नागपुरातील एकाच कुटुंबातील नऊ जखमी


नागपूर : मुलताईजवळील डहुआ गावात दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. जखमींमध्ये नागपुरातील नऊ जणांचा समावेश आहे. सी श्यामचरण आरमो रा.छिंदवाडा, असे मृतकाचे नाव आहे. (one lost life and nine others from same family from nagpur were injured in a tragic accident at multai in mp)

पुरुषोत्तम झाडे (वय ४२), सरिता झाडे (वय ३७), मुकुल झाडे (वय १८), दिपांकर झाडे (वय १५ सर्व रा. बोखारा, कोराडी), अनंतराव हिवरे (वय ४०), उज्वला हिवरे (वय ३५), नैना हिवरे (वय १२), तेजस हिवरे (वय ७ सर्व रा. येरणगाव, ता.सावनेर) व प्रभाकर गिऱ्हे (वय ६० रा. झिंगाबाई टाकळी) या जखमींवर नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये तर योगेश परस्ते, नेहा परस्ते, अंकित परस्ते, आस्था, योगेश व माधव सर्व रा.छिंदवाडा, यांच्यावर छिंदवाड्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेस सत्तेत राहणार की नाही? दिल्लीहून परतलेल्या नाना पटोलेंचं मोठं विधान

मिळालेल्या माहितीनुसार, झाडे कुटुंब नातेवाइकांसह मध्य प्रदेशातील मोरखा धनगौरी बाबा येथे दर्शनासाठी गेले. सोमवारी दुपारी ते कारने नागपूरकडे येत होते. तर परस्ते कुटुंब कारने बैतूलहून छिंदवाड्याकडे जात होते. डहुआ गावाजावळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली. जखमींना कारमधून बाहेर काढले. सर्व जखमींना मुलताईमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- सौरऊर्जेवर चालतात नळ; शाळा, अंगणवाड्यांमध्ये राबविला जातोय प्रयोग

अपघातातबाबत कळताच झाडे व हिवरे यांचे नातेवाइक मुलताई येथे पोहोचले. नातेवाइकांनी जखमींना नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

क्लिक करा आणि वाचा- वाहनचालकांच्या अंगावर उडविली दारू, वाहतूक पोलिसांनी घेतले ताब्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: