आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने पंढरपूर – विजापूर रेल्वे लवकरच धावण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे

आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने पंढरपूर – विजापूर रेल्वे लवकरच धावण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे With efforts of MLA Awtade, the Pandharpur-Bijapur railway line will soon become easier
 मंगळवेढा / प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला - मंगळवेढा - सोलापूर व पंढरपूर - विजापूर या मार्गांना जोडणारी रेल्वे सुविधा मंजूर व्हावी यासाठी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.समाधान आवताडे यांनी २५ जुलै २०२१ रोजी दिल्ली येथे जाऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb danve यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर रेल्वे प्रकल्प सुरु होण्याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करून त्यासाठी लागणारा अर्थिक निधी उपलब्ध करावा व लवकरात लवकर संबंधित योजनेचे काम सुरु करावे अनुषंगाने पत्रव्यवहार केला होता. त्यापैकी मंगळवेढा मार्गे पंढरपूर - विजापूर रेल्वेमार्ग योजनेस केंद्रीय रेल्वेमंत्रालय कार्यालय यांचेकडून  सकारात्मक प्रतिसाद देणारे व संबधित विभागास आदेशीत करणारे पत्र आ.समाधान आवताडे यांना प्राप्त झाले. त्यामुळे सदर महत्वकांक्षी योजना कार्यान्वित होण्याच्या जनतेच्या आशा आमदार  समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने आता पल्लवीत झाल्या आहेत.

आ. समाधान आवताडे यांनी पत्रात असे नमूद केले होते की,तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये अनेक वारकरी भाविक वर्षभरातील विविध वारी सोहळ्यानिमित्त कर्नाटक राज्यातून मंगळवेढामार्गे पंढरपूरला जातात. त्याचबरोबर संतांची भूमी अशी ओळख मंगळवेढ्याची संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे अनेक वारकरी भाविक पंढरपूरहून परतीच्या मार्गावर जात असताना मंगळवेढा येथे विविध संताच्या दर्शनासाठी जात असतात. सन 2013 साली सादर झालेल्या रेल्वे अर्थिक अंदाजपत्रकात पंढरपूर – मंगळवेढा – विजापूर या नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली होती. 2018 साली या रेल्वेमार्गाचा सर्व्हे होऊन त्याचे बजेट केंद्रीय रेल्वे पुणे विभाग यांनी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे सादर केले. या सर्व्हेनुसार हे काम चालू होणे अपेक्षित होते. परंतु हा प्रकल्प स्थगित ठेवणेबाबतचे पत्र ६ ऑगस्ट २०१८ नुसार मध्य रेल्वे विभाग पुणे यांना कळविण्यात आले. सदर रेल्वे प्रकल्प कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणारा असून यामुळे भाविक व शेतकरी यांना प्रवास वाहतूक अनुषंगाने दळणवळण सुविधा सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग येथील जनतेच्या दृष्टीने खुप महत्वाचा आहे. तसेच सदर योजना मार्गी लागावी यासाठी खा.रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्याचे आ.आवताडे यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: