सामाजिक बांधिलकी जपत कामाचा ठसा उमटवून कर्तव्य पार पाडणारे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे

बांधिलकी जपत आपल्या कामाचा ठसा उमटवून कर्तव्य पार पाडणारे पंढरपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे – कर्तत्वान अधिकाऱ्याचा निरोप समारंभ राष्ट्रीय चर्मकार महासंघ पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या वतीने संपन्न

खर्डी / प्रतिनिधी -पंढरपूर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही दिवसातच पंढरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला अशावेळी प्रसंगावधान राखून आपले कर्तव्य बजावणारे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी नागरिकात असलेली बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न केले. नागरिक भयभीत झाले होते, लोकांना अचूक अंदाज लावून हे बिबट्याच्या पायाचे ठसे नाहीत हे ठामपणे सांगितले व धिर देण्याचे काम केले.
विलास पवळे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले त्याचबरोबर पंढरपुरच्या वैभवात भर टाकणारे तुळशीवृंदावन हे देखील याच अधिकार्याच्या अधिपत्याखाली पूर्ण झाले. आज तुळशी वृंदावन म्हणजे तरूणाईचा सेल्फी पॉइंट झाला आहे. या ठिकाणी असलेले विविध प्रजातींच्या तुळशी विविध प्रकारच्या फुलांची झाडे भिंतीवर रेखाटलेला संतमहिमा आणि सर्व पंढरपूर करांसहीत येथे येणाऱ्या भाविकांना आकर्षित करणारी विठ्ठलाची मूर्ती असे हे तुळशी वृंदावन विलास पवळे यांच्या सुसज्ज नियोजनाची व कामांची पोहोचपावती आहे. पवळे यांच्या कार्यकीर्दि मध्ये कासेगाव रोड येथे वन परिक्षेत्राचे स्वतंत्र कार्यालय नूतन इमारतीत सुरू करण्यात आले.

हे सर्व करत असताना आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत सलोख्याने वागून त्यांचे प्रेम आत्मसात करून त्यांच्याकडून वनविभागाशी निगडित अनेक कामे करवून घेणारे अधिकारी म्हणजेच विलास पवळे . नुकतीच त्यांची सामाजिक वनीकरण इंदापूर सामाजिक वनीकरण विभाग पुणे येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बदली झाली. पंढरपूर सारख्या ठिकाणी केलेली कामे सहकारी कर्मचाऱ्यांचे लाभलेले सहकार्य आणि पार पाडलेले कर्तव्य या सर्व आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणवले होते.


अशा कार्यकर्तुत्व अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ राष्ट्रीय चर्मकार महासंघ पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे व खर्डी ग्रामस्थांच्यावतीने साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, खर्डी ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश हाके, शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान फाळके, शहाजी कांबळे, बंडू रणदिवे, भारत नवले, सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, पत्की मॅडम पंढरपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: