हवामान अंदाजानुसार कपाशी, सोयाबीन, मुंग, उडीद पिकांची काळजी घ्या
हवामान अंदाजानुसार कपाशी, सोयाबीन, मुंग, उडीद पिकांची काळजी घ्या
यवतमाळ,दि.27 ऑगस्ट : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात दि. २७ व २८ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी (१ किंवा २ ठिकाणी) हलक्या पावसाची तर दि. २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच विस्तारीत स्वरुपाच्या हवामान अंदाज प्रणालीनुसार जिल्ह्यात दिनांक २९ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वरील हवामान अंदाजानुसार कृषि विज्ञान केंद्रामार्फत पुढील सल्ला देण्यात आला आहे.
हवामान अंदाजानुसार शेतातील परिपक्व झालेल्या मुग व उडीद पिकांची कापणी करून संबंधित शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी. कपाशी व तूर पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे करावीत ज्यामुळे पिके तणमुक्त राहण्यास मदत होईल व येणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. पिकामध्ये सततच्या पावसाने पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. वापसा परिस्थितीत डवरणी करून पिकास मातीची भर द्यावी.
कापूस पिकात आकस्मिक मर (parawilt) आढळून आल्यास युरिया १०० ग्राम + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचींग करावी. तत्पूर्वी झाडाच्या बुंध्या लगतची माती पायाने दाबावी. कापूस पिकामध्ये बोंड सड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम + स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट १ ते २ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीनच्या पानावरील बुरशी जन्य ठिपके व शेंगावरील करपा रोगाचे नियंत्रण
सोयाबीन पीक सद्यपरिस्थितीत कमी कालावधीचे वाण शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे आणि पीक परिस्थिती समाधानकारक आहे, परंतु काही भागांमध्ये पानावरील बुरशी जन्य ठिपके व शेंगावरील करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याकरिता शेतकरी बांधवांनी खालील बुरशीनाशकाची फवारणी घेणे जरुरी आहे.टॅबूकोण्याझोल १० टक्के डब्ल्यू.पी. अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यू. जी. २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे बुरशीनाशकाची सुरक्षित फवारणी करावी. फवारणी करतांना कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, विद्राव्य खते यांची एकत्र मिश्रण करून फवारणी करू नये. फवारणीसाठी अंगरक्षक किटचा वापर करावा,असे यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.यु.नेमाडे यांनी