पेपर मिलच्या लाकूड डेपोला भीषण आग; साडेसात कोटींचे लाकूड जळून खाक, पेट्रोल पंपही जळाले


चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला लागलेल्या भीषण आगीत अंदाजे साडेसात कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय. बल्लारपूर-कळमना मार्गावरील हा डेपो २० एकरात पसरला होता. त्यात एकूण १५ हजार टन लाकूड साठवून ठेवले होते. यात बांबू, निलगिरी आणि सुबाभूळ यांचा समावेश आहे. याची अंदाजे किंमत साडेसात कोटी आहे. यालगत असलेला पेट्रोल पंपही आगीच्या भक्ष्यस्थानी आला. (a huge fire at a timber depot in chandrapur has burnt seven and a half crores of wood to ashes)

हा पंप गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल नसल्याने बंद होता. त्यामुळे पेट्रोल जळाले नसले तरी पंपाचे मोठे नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी अजूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्हाभरातून १५ बंब कार्यरत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘नो कास्ट ,नो रिलीजन’; जात, धर्ममुक्तीचं महाराष्ट्रात केवळ एकाच महिलेकडे असणार प्रमाणपत्र

चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील आग आणखी भडकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बल्लारपूर-आष्टी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. अग्निशमन दलाच्या बंबांचे आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. या आगीच्या स्थळाच्या अगदी शेजारी एक पेट्रोल पंप आहे. आग पेट्रोल पंपापर्यंत आग पोहचू नये यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ महसुली व पालिका अधिकाऱ्यांसह पेपर मिलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

क्लिक करा आणि वाचा- पेट्रोल टँकर-ट्रकमध्ये भीषण अपघात, एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
क्लिक करा आणि वाचा- विदर्भातील सहा हत्ती गुजरातला रवाना; कर्नाटकातून आणणार प्रशिक्षित गजराजSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: