वृक्षसंवर्धनातून पर्यावरण समृद्धीसाठी प्रयत्न – मराठी पत्रकार संघ
मराठी पत्रकार संघाची घर तिथे वृक्ष संकल्पनेची सुरुवात , वृक्षारोपणासाठी कौठाळी गाव घेतले दत्तक Efforts for Environmental Prosperity through Tree Conservation – Marathi Patrakar sangh

पंढरपूर / प्रतिनिधि – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई अंतर्गत पंढरपूर शहर व तालुका संघाच्यावतीने घर तिथे वृक्षारोपण संकल्पना राबवली जात आहे. वृक्षारोपणासाठी कौठाळी ता. पंढरपूर हे गाव दत्तक घेतले असून प्राथमिक स्वरूपात सरपंच सौ.स्वाती धुमाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सरपंच सौ स्वाती धुमाळ, उपसरपंच रामदास नागटिळक, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, शहराध्यक्ष प्रवीण नागणे, उपाध्यक्ष नागेश आदापुरे, सचिव कुमार कोरे, मार्गदर्शक राजकुमार घाडगे, संतोष रणदिवे, राधेश बागले - पाटील, रवींद्र कोळी, संजय ननवरे, दादासाहेब कदम, विश्वनाथ केमकर, मनोज पवार, राजेंद्र करपे, लक्ष्मण शिंदे, गोपीनाथ देशमुख, अॅड. दत्तात्रय पाटील, माजी सरपंच महादेव गाढवे, ग्रा.स.अनिल नागटिळक, रघुनाथ गोडसे, मुख्याध्यापक राजू पवार, धोंडीराम वाघमोडे, सचिन आटकळे, दिलीप इंगळे, डॉ.मस्के ,आरोग्य सेविका आसबे, बाळासाहेब धुमाळ, अरुण धुमाळ विकास नागटिळक, हरी सलमपुरे, संतोष भुईटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अॅड.दत्तात्रय पाटील,रामदास नागटिळक, राजेंद्र कोरके पाटील, प्रविण नागणे,राधेश बादले पाटील, सचिन आटकळे यांनी मनोगतामध्ये पत्रकार संघाच्या वृक्षसंवर्धन उपक्रमाची माहिती दिली.
कुटुंबास प्रमाणपत्र देऊन सन्मान
घर तिथे वृक्षारोपण संकल्पनेत कौठाळी येथील प्रत्येक घरामध्ये एक रोप देण्यात येणार आहे. घरातील सदस्यांनी वृक्षाचे संवर्धन करायचे आहे. वृक्षाचे योग्य संवर्धन करणाऱ्या कुटुंबास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.