लग्नाचा पंचविसावा वाढदिवस ट्रॅफिक जॅममध्ये गेला; संतापलेल्या पुणेकराने थेट पोलीस स्टेशनच गाठले!


पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराला प्रचंड राहदारीचे शहर देखील म्हटले जाते. शहराच्या मध्यवर्ती भागासह शहरातील विविध ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच वाहतूक कोंडीचा फटका पुणेकरांना दरोरोज बसत असतो. अशाच वाहतुकीचा फटका बसलेल्या एका पुणेकराने चक्क महाराष्ट्र शासन आणि वाहतूक विभागाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (25th marriage anniversary spoiled due to traffic jam)

काय आहे नेमका प्रकार?

पुण्यातील संदीप नहार हे आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी २२ तारखेला म्हणजेच रविवारी आपल्या पत्नी मनीषा नहार यांच्यासोबत सकाळी पानशेत परिसरात गेले होते. लग्नाचा वाढदिवस साजरा करुन दुपारी नहार आपल्या चारचाकी वाहनाने पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले. रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंहगड व पानशेत परिसरात आले होते. खडकवासला चौपाटी परिसरातही पर्यटकांची तुडुंब गर्दी होती. परिणामी डोणजे फाट्यापासूनच नहार वाहतूक कोंडीत अडकले. पाच तास वाहतूक कोंडीत अडकल्याने व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस दिसत नसल्याने संदिप नहार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लग्नाचा वाढदिवस आणि तोही पंचविसावा. अशात पाच तास ट्राफिक जाममध्ये वाया गेल्याने नहार खूपच संतापले आणि महाराष्ट्र सरकार व पोलीस प्रशासनाविरोधात तक्रार करण्यासाठी त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले.

क्लिक करा आणि वाचा- वडील कालच म्हणाले; मुलाला शोधून द्या, १ लाख देतो, अन् आज नको ती बातमी आली…

महाराष्ट्र शासन आणि वाहतूक पोलिसांविरोधात तक्रार दाखल

वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर मी १०० नंबर वर फोन केला. त्यांनी ११२ नंबरवर फोन करण्यास सांगितले. त्यानुसार त्यावर फोन करून तक्रार केली. पोलीस येतील असे त्यांनी सांगितले, परंतु कोणीही आले नाही. खडकवासला चौपाटीवर दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त वाहने उभी होती. त्यांच्यावर का कारवाई करण्यात येत नाही. पोलीस होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, तेथे तर दोघेच दिसत होते, इतर कोणीच नव्हते. माझा वेळ गेला आहे. माझी तक्रार घेतल्याशिवाय मी हवेली पोलीस स्टेशन सोडणार नाही, असे सांगत नहार हे साडे दहा वाजेपर्यंत अभिरुची पोलीस स्टेशन येथे थांबून होते. नंतर त्यांनी महाराष्ट्र शासन आणि वाहतूक पोलीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- चिंता वाढली! राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवली

‘वेळप्रसंगी न्यायालयात जाणार’

आता या विरोधात नहार हे पुणे पोलीस, ग्रामीण पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासन, खासदार, पालकमंत्री यांच्याकडे देखील याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. वेळ प्रसंगी न्यायालयात देखील जाण्याची तयारी नहार यांनी व्यक्त केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- पुण्यात मोठी कारवाई, संशयित दहशतवाद्याला अटक; काश्मीरमधील संघटनेच्या संपर्कात होताSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: