तारकर्ली समुद्रात बोट बुडाली, आमदाराचा भाचा बुडाला, पुण्याच्या प्रसिद्ध डॉक्टरांचंही निधन


पुणे : सिंधुदुर्ग मालवण तारकर्ली समुद्रात स्कुबा बोट बुडून दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय ४५) यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी आज २४ मालवणमधील तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर घडली.

मयतांमध्ये जुन्नरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ. स्वप्नील मारुती पिसे यांचा समावेश…

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुन्नर आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. स्वप्नील पिसे हे कुटुंबियांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. आज मंगळवारी सकाळी तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावरून २० जणांना घेऊन बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. त्यानंतर स्कुबा डायव्हिंगही व्यवस्थित पार पडले. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला आहे. डॉ. पिसे यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने आळेफाटा शहरावर शोककळा पसरली आहे.

नावाला जंगलाचा राजा, अस्वलाला बघून पळाला, वाघाचा आणि अस्वलाचा Video तुफान व्हायरल
दरम्यान, या दुर्घटनेत बाळापूर मतदार संघातील शिवसेना आमदार नितिन देशमुख यांचा भाचा आकाश देशमुख याचा देखील मृत्यू झाला आहे. जखमींवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचं समोर आलं आहे. मात्र, बोट समुद्रात अचानक का उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तारकर्लीचा समुद्रकिनारा हा स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. या दुर्घटनेमुळे सध्या तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

तुमच्या टीव्हीवर देखील घेऊ शकता युट्यूब व्हिडिओचा आनंद, जाणून घ्या ही सोपी प्रोसेसSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: