श्रीमती कमल राजा पाटील यांचे निधन

प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज स्मारकच्या भूमी दातार धर्मनुरागी श्रीमती कमल राजा पाटील यांचे निधन Mrs. Kamal Raja Patil passed away
कोल्हापूर ,29/08/2021 - यळगुड ,तालुका हातकणंगले येथील धर्मानुरागी श्रीमती कमल राजा पाटील, वय वर्ष 92 यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.सध्या त्यांचे वास्तव्य मुंबई येथे होते . त्या अत्यंत धार्मिक परोपकारी व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.

       प्रथमाचार्य परमपूज्य श्री 108 शांतिसागर महाराज जी यांच्या पूर्वाश्रमीच्या मामांच्या त्या नातसून होत्या.त्यांचे पती राजा सिद्धगोंडा पाटील हे वैमानिक होते . राजा यांचे ज्येष्ठ बंधू जनगोंडा सिद्धगोंडा पाटील हे मुंबई पान व्यापार संघाचे संस्थापक व मोठे उद्योगपती होते.

   दक्षिण भारत जैन सभेच्या यळगुड येथील प्रथमाचार्य श्री 108 शांतीसागर महाराज जी यांच्या स्मारक उभारणीसाठी पाटील परिवारा कडून जन्मभूमी मधील काही जागा दान म्हणून दिली आहे. सध्या त्याच जागेवर भव्य दिव्य असे प्रथमाचार्य श्री 108 शांतीसागर जी स्मारक या नावाने मोठे स्मारक उभे राहिले आहे.त्यांच्या या बहुदानाचा समाजासाठी मोठा लाभ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: