गोफणगुंडा
गोफणगुंडा....
सुख का सोपं असतं
परिश्रमाशिवाय का ते मिळतं?
दु:खाशिवाय सुख येत नाही
म्हणूनच ते सोसाव लागतेच ना ? !!१!!
सुख कशात आहे हे ठरवावे लागतेच ना?
दृश्य अदृश्य गतिरोधकाना सामोरे जात
उद्देशपूर्ती करावीच लागते ना !!२!!
सार्वजनिक जीवनात निंदा उपहास अफवा
हे सोसावे लागतेच ना
आपण पारदर्शक प्रामाणिक राहिलात तर
कोण आडवं येणार ?!!३!!
सुखाची अतिलालसा मोह यातच
माणूस स्वतःला हरवून गेला आहे
जातांना रिक्त हाताने जायचे हेच
माणूस विसरतो आहे !!४!!
"सुप्रभात"
“कोणतीही वेळ असो , सारखीच असते .शुभ अशुभ असं कांहीच नसतं ,पण गेलेली वेळ पुन्हा येत नाही हे विसरू नये .”!!
आनंद कोठडीया,जेऊर ,ता.करमाळा
९४०४६९२२००
