बँंक हॉलिडे; जाणून घ्या जून महिन्यात किती दिवस बँंका बंद राहणार


मुंबई : पुढील महिन्यात जवळपास सर्वच कामकाजाचे दिवस बँका सुरु राहणार आहेत. जून २०२२ मध्ये शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवस बँकांचे कामकाज सुरु राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.

इंधन स्वस्ताईचा श्रेयवाद ; जाणून घ्या इंधनावरील कर प्रणाली आणि राज्यांचा कर
रिझर्व्ह बँकेच्या वेळापत्रकानुसार काही राज्यांमध्ये स्थानिक सण उत्सवानुसार बँकांना रजा जाहीर केली जाते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट जून महिन्यात दोन दिवस बँकांना रजा असून सहा दिवस साप्ताहिक सुट्टी असेल.

पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव
यातील पहिली सुट्टी २ जून २०२२ रोजी महाराणा प्रताप जयंती निमित्त शिलॉंगमध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी आहे. त्यांनतर १५ जून २०२२ रोजी गुरु हरगोविंद यांच्या जयंती निमित्त ऐझवाल, भुवनेश्वर, जम्मू, श्रीनगर या ठिकाणी बँकांना रजा असेल. उर्वरित देशभरात बँका या दोन्ही दिवशी नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

अस्थिर शेअर बाजार प्रवासात हे पेनी स्टॉक मात्र अप्पर सर्किटमध्ये पोहोचले
जून महिन्यात ५ तारखेला रविवार, ११ जून २०२२ रोजी दुसरा शनिवार आणि १२ जून रोजी रविवार तसेच त्यांनतर १९ जून रोजी रविवारी बँकां बंद राहतील. त्याशिवाय २५ जून रोजी चौथा शनिवार आणि २६ जून रोजी रविवार हे दिवस देशभरातील बँका साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने बंद राहतील.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: