हृदयासंबंधी त्रासामुळे नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल


मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हृदयासंबंधी त्रास होऊ लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राणे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

नारायण राणे यांना आज सकाळी अचानक हृदयासंबंधी त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता राणे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राणे यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रियाही करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.

शिवसेना -भाजप वाद पुन्हा पेटला ; देवबाग बंधाऱ्यावरून निलेश राणेंनी सुनावलंSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: