रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; लवकरच उरका हे काम नाहीतर होईल नुकसान


मुंबई : वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीचा झपाट्याने होणारा प्रसार आणि लॉकडाऊनमधील गरिबांची परिस्थिती पाहता पाहता सरकारने मोफत रेशनची सुविधा सुरू केली होती. शासनाची ही सुविधा आजतागायत सुरू आहे. कोरोना काळात लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकजण बेरोजगार झाले. अशा लोकांना मदत करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारची ही योजना सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.

पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव
३० जूनपर्यंत आधारशी लिंक करा
आता सरकारी रेशनची सुविधा घेणाऱ्यांना रेशन कार्ड आणि आधार लिंक करण्याचा नियम सरकारने केला आहे. यापूर्वी याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती. मात्र शेवटच्या दिवशी ती वाढवून ३० जून करण्यात आली. जर तुम्ही आधार आणि रेशन कार्ड लिंक केले नसेल तर लवकर करा, असे न केल्यास तुमची मोफत रेशन सुविधा सरकार बंद होऊ शकते.

वाचा – Vehicle Insurance Premium: वाहनधारकांना दुहेरी झटका; जूनपासून थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये होणार भरमसाठ वाढ
सरकार मोठी योजना राबवण्याच्या तयारीत
काही कारणास्तव लाखो कुटुंबांना रेशन कार्ड आधारशी लिंक करता आलेले नाही. तुम्हीही दोन्ही गोष्टी लिंक केल्या नसतील तर लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही ते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रक्रियेद्वारे लिंक करू शकता. केंद्र सरकारच्या ‘वन कार्ड, वन नेशन’ योजनेसाठी त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

‘इन्फोसिस’मध्ये कोटींची उड्डाणे! सलील पारेख यांना ८८ टक्के पगारवाढ, आकडा वाचून व्हाल थक्क
मोफत रेशन बंद होईल
‘वन कार्ड, वन नेशन’ योजनेंतर्गत, तुम्ही कोणत्याही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात रेशन घेण्यास अधिकृत आहात. आगामी काळात संपूर्ण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता अपेक्षित आहे. शिधापत्रिका (रेशन कार्ड) आधारशी लिंक न केल्यास आगामी काळात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. चला आधार आणि रेशन कार्ड एकमेकांशी कसे लिंक करायचे? जाणून घ्या

वाचा – PF Account Nomination: पीएफ खातेधारकांनो नाॅमिनेशन केले का; ई-नॉमिनेशनने मिळतील ३ फायदे, जाणून घ्या
आधार आणि रेशन कार्ड असे लिंक करा
1. सर्वप्रथम आधार वेबसाइट uidai.gov.in सुरु करा.
2. येथे ‘Start Now’ वर क्लिक करा.
3. येथे, तुमचा पत्ता आणि जिल्हा इत्यादी तपशील भरा.
4. यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ पर्यायावर क्लिक करा.
5. येथे तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इ. प्रविष्ट करा.
6. ते भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
7. तुम्ही OTP भरताच, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
8. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे आधार पडताळले जाईल. तसेच आधार आणि रेशन कार्ड लिंक केले जाईल.

रेशनकार्डशी आधार लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्डची प्रत, शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकाधारकासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो शिधापत्रिका केंद्रावर जमा करावयाचा आहे. याशिवाय तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन रेशनकार्ड केंद्रावरही केले जाऊ शकते.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: