How To Murder Your Husbandच्या लेखिकेने तिच्याच पतीची केली हत्या; काय घडलं नेमकं?


हाऊ टू मर्डर युअर हसबंड या लेखाची लेखिका नॅन्सी क्रॉम्पटन ब्रॉफीला पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. लेखिका नॅन्सी क्रॉम्पटन ब्रॉफी यांनी २०११मध्ये हाऊ टू मर्डर युअर हसबंड हा ब्लॉग लिहला होता. हा लेख प्रसिद्ध झाल्याच्या सात वर्षानंतर नॅन्सी यांनी त्यांचे पती डेनियल ब्रॉफी यांची गोळी मारुन हत्या केली. अमेरिकेतील ओरेगॉन कोर्टामध्ये याप्रकरणी खटला सुरू होता

हे प्रकरण २०१८ सालचे असून नॅन्सीने तिचे पती डेनिअल ब्रॉफी यांची गोळी मारुन हत्या केली. मात्र, पाच वर्षानंतर या प्रकरणात तिच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले. डेनिअल हे पेशाने शेफ होते. तिथे ते विद्यार्थ्यांना शिकवत देखील होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डेनिअलच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा मृत्यू होताना पाहिलं होतं. त्यावेळी तिथल्या लोकांनी नॅन्सीला घटनास्थळावरुन जातानाही पाहिलं होतं.

डेनिअलच्या विमाचे ११ कोटी रुपये मिळवण्यासाठी नॅन्सीने त्याची हत्या केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता. डेनिअलची हत्या करण्यासाठी नॅन्सीने बंदूकही खरेदी केले होते. आरोपीने आधीच पतीच्या हत्येचा प्लान तयार केला होता, असा दावा वकिलांनी कोर्टात केला होता. तसंच, नॅन्सी आणि डेनिअल हे २५ वर्षांपासून एकत्र आहेत. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद नव्हते, असाही दावा वकिलांनी केला होता.

वाचाः मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय घडलं? संभाजीराजेंनी सांगितली Inside Story

नॅन्सीने तिच्या रिसर्चसाठी व सुरक्षेसाठी हे बंदूक खरेदी केले होते. तसंच, बंदुकाचे वेगवेगळे भाग हे लेखाच्या संशोधनासाठी खरेदी केले होते, असाही दावा वकिलांनी केला आहे. दरम्यान, नॅन्सीने लिहलेल्या कथेतही लिहले होते की, महिलेने बंदुकीचे भाग जोडून एक हत्यार तयार करते, व तिच्या पतीची हत्या करते.

वाचाः घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा निवडणूक लढवणार नाही; संभाजीराजेंची मोठी घोषणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: