भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन अस्वच्छता,अनारोग्य, कोरोना विषाणूला हद्दपार करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन अस्वच्छता, अनारोग्य, कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. Let’s get rid of unhygienic, unhealthy, corona virus by taking inspiration from Lord Krishna Janmashtami celebrations – Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 30/ 08/2021: भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम राखूया. कृष्णाला सखा सर्वोत्तम मानले जाते. ते सर्व प्राणिमात्रांची आणि जीवलगांची काळजी वाहतात. त्यांना नमन करताना आपणही सर्वांची काळजी घेवूया. घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: