‘उद्धव ठाकरे…संभाजीराजेंचं आव्हान स्वीकारा, कोणी खंजीर खुपसला हे जनतेला समजेल’


मुंबई : राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीबाबत दिलेला शब्द मोडल्याचा आरोप केला. संभाजीराजेंच्या या आरोपानंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल,’ असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही, एखादं तथाकथित सेक्युलर नाव शोधा, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

राणा दाम्पत्यामुळे बिल्डिंगमधील सगळेच फ्लॅटधारक गोत्यात; पालिकेची नोटीस

‘युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?’

भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत बंद खोलीत दिलेला शब्द मोडल्याने आम्ही युतीतून बाहेर पडत आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घेतली होती. उद्धव ठाकरे यांना याच भूमिकेची आठवण करून देताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ‘राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या टीकेला शिवसेनेकडून कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘चंपावाणीचा जाहिर निषेध’ म्हणत राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांचा समाचारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: