वार्षिक ११.५० टक्क्यांपर्यंत व्याज; इंडेल मनीचा अपरिवर्तनीय रोख्यांचा दुसरा टप्पा


मुंबई : सुवर्ण कर्ज क्षेत्रातील व्यवस्थागत महत्त्वाची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी इंडेल मनी लिमिटेडने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीच्या दुसऱ्या टप्प्याची आज घोषणा केली. ही रोखेविक्री २७ मे २०२२ रोजी खुली होईल आणि २२ जून २०२२ रोजी (भरणा लवकर पूर्ण झाल्यास लवकर बंद करण्याच्या पर्यायासह) बंद होईल. प्रतिवर्ष ११.५० टक्क्यांपर्यंत व्याज उत्पन्न मिळेल, असे कंपनीनं म्हटलं आहे.

इंधन स्वस्ताईचा श्रेयवाद ; जाणून घ्या इंधनावरील कर प्रणाली आणि राज्यांचा कर
रोखेविक्री संबंधाने इंडेल मनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश मोहनन म्हणाले, “आमच्या स्पर्धात्मक सामर्थ्यांचा फायदा घेण्यासाठी, सोने तारण कर्ज उद्योगात आमचे स्थान वाढवण्यासाठी आणि बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्यासाठी आम्ही व्यावसायिक रणनीती तयार केली आहे. नवीन शाखा उघडून आमच्या शाखांच्या जाळ्यात विस्तार करून कर्ज वितरण व्यवसाय वाढवण्याचा आमचा मानस आहे. वाढीव महसूल, नफा आणि दृश्यमानता हे घटक शाखा विस्ताराला चालना देणारे घटक आहेत. या रोखेविक्रीमुळे आम्हाला आमच्या निधीच्या स्त्रोतांमध्ये लक्षणीय विविधता आणण्यास मदत होईल. एनसीडी विक्रीद्वारे उभारला गेलेला दीर्घकालीन निधी आम्हाला भविष्यातील कोणत्याही व्याजदरात वाढीतून जोखमीपासून संरक्षण देणारा ठरेल.”

सुरक्षित रोख्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी १,००० रुपये आहे. या रोखेविक्रीचे ५० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारणीचे मूळ आकारमान आहे आणि अधिक प्रतिसाद लाभल्यास अतिरिक्त ५० कोटी रुपयांपर्यंत निधी राखण्याच्या पर्यायासह एकूण १०० कोटी रुपयांपर्यंत रोख्यांची विक्री केली जाणार आहे. या रोखेविक्रीचे प्रमुख व्यवस्थापक व्हिव्हरो फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

तेजीच्या शेअर बाजारात ‘या’ पेनी स्टॉकने अप्पर सर्किट गाठले
या रोखेविक्रीद्वारे जमा केलेला निधी (किमान ७५ टक्के) पुढील कर्ज व्यवहार, वित्तपुरवठा यासाठी आणि कंपनीवरील कर्जाची मुद्दल आणि व्याजाची परतफेड/ आगाऊ परतफेड आणि (जास्तीत जास्त २५ टक्क्यांपर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी* वापरला जाईल.

शेअर बाजार गुंतवणूक; प्राईस व्हॉल्युम ब्रेकआऊटसह हे ठरले अव्वल स्टॉक
रोखे विक्रीतून प्राप्त निधी हा आधी वर नमूद केलेल्या घटकांसाठी वापरला जाईल. एकूण जमा निधीच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही असा उर्वरित निधी सेबीच्या एनसीएस नियमनाचे अनुपालन करताना, सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यास अनुमती देण्यात आली आहे.

बँंक हॉलिडे; जाणून घ्या जून महिन्यात किती दिवस बँंका बंद राहणार
आर्थिक वर्ष २०२२च्या तिसऱ्या तिमाहीत इंडेल मनीने सोने तारण कर्जाअंतर्गत व्यवस्थापित निधी (एयूएम) ४२४.७५ कोटी, जो आधीच्या २०२१ वर्षातील याच तिमाहीत ३०९.९७ कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षात ४१ टक्क्यांच्या वाढीच्या नियोजनासह हे एयूएम ८५० कोटी रुपयांवर नेण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनीकडून व्यवस्थापित एकूण निधीमध्ये (एयूएम) सोने तारण कर्जाचा वाटा २८ फेब्रुवारी २०२२ रोजी असलेल्या ८३.६९ टक्के पातळीवरून, ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: