बेंगळुरूचे दोन धुरंधर सॅमसनसाठी ठरू शकतात खलनायक, राजस्थानच्या फायनलचे स्वप्न धुळीस मिळवतील


RCB vs RR Qualifier 2: मुंबई : आयपीएल २०२२ मधील राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील दुसरा क्वालिफायर शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. एकेकाळी बेंगळुरूचा संघ आयपीएलमधून बाहेर होण्याच्या मार्गावर होता. त्यांचे नशीब मुंबई इंडियन्सच्या हातात होते, ज्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आरसीबीला प्ले ऑफचे तिकीट मिळवून दिले. मुंबईचा संघ बाहेर पडला, पण त्यांनी आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहोचवले. आता नशीब आरसीबीच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. एलिमिनेटर सामन्यात संघाने शानदार खेळ दाखवत लखनौ सुपर जायंट्सला बाहेरचा रस्ता दाखवला.

वाचा – IPL च्या क्वालिफायर २ मध्ये बेंगळुरूचा प्रवेश, पण संघाच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला क्वालिफायर १ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील संघ साखळी फेरीनंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असताना त्याला अंतिम फेरीची दुसरी संधी मिळाली. पण, इथे चूक झाली तर २००८ नंतर विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवू शकते. राजस्थानला आरसीबीविरुद्धची दुसरी क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीचे तिकीट मिळवायचे असेल, तर संजू सॅमसनची फलंदाजी आवश्यक आहे.

संजू सॅमसनचा जबरदस्त फॉर्म
जोस बटलरनंतर राजस्थानसाठी कर्णधार सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. आयपीएल १५ मध्ये आतापर्यंत सॅमसनने नेतृत्वासह उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत १५ सामन्यात ४२१ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. पण, सॅमसनला रोखण्यासाठी बेंगळुरू संघाकडे एक नाही, तर दोन शस्त्रे आहेत. पहिला वानिंदू हसरंगा आणि दुसरा मोहम्मद सिराज.

वाचा – आयपीएल एलिमिनेटरमध्ये लखनौचा खेळ खल्लास, या एका गोष्टीने केला संघाचा घात, जाणून घ्या

आरसीबीकडून हसरंगाने सर्वाधिक विकेट घेतल्या
आयपीएलच्या या मोसमात हसरंगाने आतापर्यंत १५ सामन्यात १६.१६ च्या सरासरीने २५ बळी घेतले आहेत. तो प्रत्येक १३व्या चेंडूवर फलंदाजांसाठी खलनायक ठार आहे. त्याने या मोसमात युझवेंद्र चहल (२६ विकेट) नंतर सर्वाधिक विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत दोन गोलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे.

वाचा – ‘विराट’ विक्रम मोडणे राजस्थानच्या ‘रॉयल’ साठी कठीण, पण दिग्गजांना मागे टाकण्याची संधी

हसरंगाने सॅमसनला ५ वेळा बाद केले
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हसरंगाचा सॅमसनविरुद्धचा रेकॉर्ड. श्रीलंकन लेगस्पिनरने ६ टी-२० डावात पाच वेळा सॅमसनला बाद केले आहे. त्याचवेळी हसरंगासमोर राजस्थानच्या कर्णधाराची बॅटही शांत राहिली आहे. हसरंगाविरुद्ध सॅमसन २३ चेंडूत १८ धावाच करू शकला आहे. दुसरीकडे, मोहम्मद सिराजचाही सॅमसनविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. सॅमसनने सिराजच्या २० चेंडूत २१ धावा केल्या असून या वेगवान गोलंदाजाने राजस्थानच्या कर्णधाराला दोनदा बाद केले आहे. अशा स्थितीत आरसीबीविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सॅमसनला या दोन गोलंदाजांपासून सावध राहावे लागणार आहे. थोडीशी चूक आणि राजस्थानचे दुसरे जेतेपदाचे स्वप्न भंग होऊ शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: