दगडूशेठला बाहेरुनच हात जोडले, पवार म्हणतात, नॉनव्हेज खालल्याने बाहेरुनच दर्शन


पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी येणार होते. मात्र, त्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. ‘मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही‘, असं यावेळी शरद पवार म्हणाले, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

हेही वाचा –पवारांनंतर विकासाचं व्हिजन असलेला राष्ट्रीय नेता म्हणजे गडकरी: संजय राऊत

दगडूशेठच्या शेजारी असणारी गृह विभागाची जागा दगडूशेठ ट्रस्टला देण्याचे अनेक दिवसांची मागणी होती. त्यासाठी शरद पवार भिडे वाडा आणि दगडूशेटचा पाहणीसाठी आले होते. यावेळी ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार होते, मात्र मंदिराच्या आत न जाता त्यांनी बाहेरूनच गणपतीला हात जोडले. नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून मंदिरात शरद पवार गेले नाहीत, असं प्रशांत जगताप म्हणाले. तसेच, बोलघेवड्या नेत्यांपेक्षा एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिला, असं शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

हेही वाचा –जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या, पवारांची केंद्राकडे मोठी मागणी

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाटेची पहिली जागा संभाजीराजेंना सोडावी | फडणवीसSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: