फ्लेक्सी कॅप फंडांना पसंती ; मागील वर्षात ३५ हजार ८७७ कोटींची गुंतवणूक


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘फ्लेक्सी कॅप’ प्रकारांतील म्युच्युअल फंडामध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३५,८७७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. फ्लेक्सी प्रकारामध्ये ‘लार्ज’, ‘मिड’ किंवा ‘स्मॉल’ कॅप फंडांसारख्या मर्यादा नसतात. म्युच्युअल फंडातील एकूण निधीतील ६५ टक्के रक्कम कुठल्याही प्रकारच्या फंडात फ्लेक्सी फंड गुंतवतात. इक्विटी प्रकारातील ही सर्वाधिक गुंतवणूक असल्याचे म्युच्युअल फंड संघटनेने म्हटले आहे.

‘नोव्हेंबर २०२०मध्ये ‘फ्लेक्सी कॅप’ प्रकाराची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अनेक ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यां’नी (एएमसी) आपापल्या फंडांतील गुंतवणुकीचे फेरनियोजन केले. या कंपन्यांनी मल्टिकॅप फंड तयार केले. मल्टिकॅप फंडमधील कंपन्यांनी त्यांच्याकडील निधी ‘फ्लेक्सी कॅप फंड‘मध्ये गुंतवण्यास सुरुवात केली,’ असे निरीक्षण ‘मॉर्निंगस्टार इंडिया’ने केले आहे.

‘फ्लेक्सी कॅप’मधील ३५,८७७ कोटी रुपयांपैकी २०२१-२२ या वर्षातील पहिल्या तिमाहीत २,४७८ कोटी रुपये, दुसऱ्या तिमाहीत १८,२५८ कोटी रुपये, तिसऱ्या तिमाहीत ६१९१ कोटी रुपये आणि चौथ्या तिमाहीत ८,९५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. २०२१-२२ या आर्थिक वर्षात लार्ज कॅप फंडामधील गुंतवणूक १३,५६९ कोटी रुपये, मिड कॅप फंडामधील गुंतवणूक १६,३०८ कोटी रुपये आणि स्मॉल कॅप फंडामधील गुंतवणूक १०,१४५ कोटी रुपये इतकी झाली. मल्टि कॅप फंडामध्ये २८,०९५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: