Tsunami Warning: पूर्व तिमोरच्या किनारपट्टीला शक्तीशाली भूकंपाचा धक्का; हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा


नवी दिल्ली: पूर्व तिमोर (East Timor)च्या किनारपट्टीला शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे हिंद महासागरात त्सुनामी (Tsunami )चा इशारा देण्यात आलाय. पूर्व तिमोरला बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी होती. यामुळे भारतीय उपमहासागरात त्सुनामीचा इशारा दिलाय.

भूकंपामुळे अद्याप कोणत्याही हानीचे वृत्त हाती आलेले नाही. मात्र भारतीय महासागरातील त्सुनामी इशारा आणि नियंत्रण यंत्रणेने त्सुनामीचा इशारा दिला आहे. पूर्व तिमोरची राजधानी दिली येथे भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्र बिंदू हा पूर्व तिमोर आणि इंडोनेशियाच्या मध्ये समुद्रात ५१.४ किमी खाली होता. या भूकंपानंतर युरोपीय केंद्राने मात्र त्सुनामीची शक्यता फेटाळून लावली आहे. पूर्व तिमोर आणि इंडोनेशिया हे देश ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात आहेत. या क्षेत्रात भूकंप होण्याचे प्रमाण अधिक आहे.

वाचा- How To Murder Your Husbandच्या लेखिकेने तिच्याच पतीची केली हत्या

फेब्रुवारी महिन्यात इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्राला ६.२ रिश्टर स्केल तीव्रताच्या भूकंपाचा धक्का बसला होता. तेव्हा १२हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.

वाचा- पाकिस्तानात १८० रुपये लिटर पेट्रोल; माजी PM म्हणाले, ‘भारताकडून काही तरी शिका’

२००४ साली सुमात्रा बेटाजवळ ९.१ रिश्टर स्केल तीव्रताच्या भूकंपाचा धक्का बसला होता. तेव्हा निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे २ लाख २० जणांचा जीव गेला होता. त्यापैकी १ लाख ७० हजार इंडोनेशियातील होते. पूर्व तिमोरची लोकसंख्या १.३ मिलियन इतकी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: