राजस्थानच्या खेळाडूने सोडली संघाची साथ, प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी सांगितले मोठे कारण


अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यामध्ये आज क्वालिफायर-२ हा सामना रंगणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानच्या संघाला धक्का बसला आहे. कारण राजस्थानचा एक महत्वाचा खेळाडू संघाची साथ सोडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याबाबत राजस्थानचे प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी एका खास व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे.राजस्थानच्या कोणत्या खेळाडूने संघाची साथ सोडली, पाहा…
राजस्थानच्या संघाला गुजरात टायटन्सकडून पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर आता राजस्थानच्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची अजून एक संधी मिळणार आहे. पण त्यासाठी त्यांना आरसीबीविरुद्धच्या क्वालिफायर-२ या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. पण या महत्वाच्या सामन्यापूर्वी आता राजस्थानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण राजस्थानच्या संघातील डॅरिल मिचेल हा राजस्थानची साथ सोडून जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राजस्थानचा संघ सध्याच्या घडीला महत्वाच्या वळणावर आहे. पण त्याचवेळी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये क्रिकेट मालिका रंगणार आहे. न्यूझीलंडच्या संघात मिचेलला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मिचेलला मायदेशी रवाना व्हावे लागणार आहे. त्यामुळे मिचेल हा राजस्थानच्या संघाची साथ सोडणार असल्याचे आता समोर आले आहे.

राजस्थान आणि आरसीबीमध्ये रंगणार क्वालिफायर-२
राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यामध्ये आज क्वालिफायर-२ चा सामना रंगणार आहे. एकेकाळी बेंगळुरूचा संघ आयपीएलमधून बाहेर होण्याच्या मार्गावर होता. त्यांचे नशीब मुंबई इंडियन्सच्या हातात होते, ज्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आरसीबीला प्ले ऑफचे तिकीट मिळवून दिले. मुंबईचा संघ बाहेर पडला, पण त्यांनी आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहोचवले. आता नशीब आरसीबीच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. एलिमिनेटर सामन्यात संघाने शानदार खेळ दाखवत लखनौ सुपर जायंट्सला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे राजस्थान पराभवानंतर या सामन्यात मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो आणि अंतिम फेरी गाठतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: