प्राप्तिकर विभागाचा नवा नियम; बँंकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी पॅन-आधार बंधनकारक


नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत बँक खातेदारांना झटका दिला आहे. यापुढे २० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा करताना किंवा खात्यातून काढताना पॅनकार्ड आणि आधार कार्ड सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय चालू खाते सुरु करताना आणि कॅश क्रेडीट सुविधा बँकेकडून प्राप्त करताना संबधित ग्राहकाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. हा नवा नियम गुरुवार २६ मे २०२२ पासून लागू झाला आहे.

वार्षिक ११.५० टक्क्यांपर्यंत व्याज; इंडेल मनीचा अपरिवर्तनीय रोख्यांचा दुसरा टप्पा
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्ती जो २० लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करेल ( पैसे खात्यात जमा करणे किंवा खात्यातून काढणे) त्याला पॅनकार्ड आणि आधारकार्ड सादर करावे लागले, असे म्हटले आहे.

सोनं महागले ; कमॉडिटी बाजारात ‘हा’ आहे आजचा सोने-चांदीचा दर
त्याचबरोबर ग्राहकाने सादर केलेलं पॅनकार्ड आणि आधार कार्ड आणि इतर तपशील कलम १३९ ए नुसार छाननीसाठी प्राप्तिकर प्रधान महासंचालक किंवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे.

ड्रोन उद्योगात अदानींची भरारी; बंगळुरातील ड्रोन उत्पादक कंपनीला थेट खरेदी केले
दरम्यान या नव्या नियमावलीमुळे बँकांना आता अशा मोठ्या रकमेचे व्यवहार करताना खातेदारांचा पॅनकार्ड आणि आधारकार्डची माहिती ठेवावी लागणार आहे. हा नियम केवळ बँकिंग क्षेत्रापुरताच नाही तर पोस्ट ऑफिस आणि सहकारी संस्थासाठी देखील लागू झाला असल्याचे कर सल्लागारांचे मत आहे. बँकिंग व्यवहारांमधून अर्थव्यवस्थेत येणाऱ्या काळ्या पैशांवर आता केंद्र सरकारची करडी नजर आहे. असे मोठे व्यवहार करणारे ग्राहक यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पॅनकार्ड आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: