ड्रोन उद्योगात अदानींची भरारी; बंगळुरातील ड्रोन उत्पादक कंपनीला थेट खरेदी केले


बंगळुरु : टाइम मॅगझिनच्या जगातील १०० प्रभावी व्यक्तींपैकी एक असलेले अब्जाधिश उद्योजक गौतम अदानी यांची नजर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या ड्रोन उद्योगावर गेली आहे. अदानी समूहातील एका कंपनीने बंगळुरुतील जनरल एअरोनॉटिक्स या कंपनीची थेट खरेदी केली आहे.

तेजीच्या शेअर बाजारात ‘या’ पेनी स्टॉकने अप्पर सर्किट गाठले
अदानी समूहातील एन्टरप्राइजेसची उप कंपनी अदानी डिफेन्स सिस्टम अॅंड टेक्नॉलॉजी या कंपनीनं बंगळुरातील जनरल एअरोनॉटिक्स या कंपनीवर ताबा मिळवला आहे. हा व्यवहार रोखीमध्ये झाला असून तो नेमका किती कोटींमध्ये झाला ही माहिती गोपनीय ठेवली आहे.

फ्लेक्सी कॅप फंडांना पसंती ; मागील वर्षात ३५ हजार ८७७ कोटींची गुंतवणूक
जनरल एअरोनॉटिक्स ही कंपनी कमर्शिअल ड्रोनची निर्मिती करणारी कंपनी आहे. २०१६ मध्ये कंपनीने ड्रोन उत्पादनात पाऊल ठेवले होते. त्याशिवाय लष्करासाठी ड्रोन तयार करणे, एआय आणि एमएल क्षमतेची ड्रोन तयार करणे तसेच कृषी क्षेत्रासाठी ड्रोन तयार केले जातात.

सोनं महागले ; कमॉडिटी बाजारात ‘हा’ आहे आजचा सोने-चांदीचा दर
जनरल एअरोनॉटिक्स कृषीविषयक सेवा देखील पुरवते. ज्यात रोबोटिक्स ड्रोन आणि इतर आवश्यक ड्रोन्सची निर्मिती केली जाते. पिकांचे संरक्षण, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आणि कृषीबाबत अभ्यास अहवाल कंपनीकडून तयार केले जातात. अदानी डिफेन्स सिस्टम अँड टेक्नॉलॉजी या कंपनीनं जनरल एअरोनॉटिक्समधील ५० टक्के हिश्श्याची रोख रकमेवर खरेदी केली आहे.

वार्षिक ११.५० टक्क्यांपर्यंत व्याज; इंडेल मनीचा अपरिवर्तनीय रोख्यांचा दुसरा टप्पा
टाइम मासिकाने २०२२मधील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकताच जाहीर केली. या यादीत तिघा भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. यात सर्वोच्च न्यायालयातील वकील करुणा नंदी, उद्योगपती गौतम अदानी आणि काश्मीरमधील मानवाधिकारासाठी लढणारे कार्यकर्ते खुर्रम परवेज यांचा समावेश होता. अदानी ग्रुप बद्दल बोलताना टाइमने म्हटले होते की, हा उद्योग समूह भारतात फार प्रभावशाली आहे. सर्वसाधारण गौतम सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहतात. ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: