रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !


मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी २९ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवली दरम्यान १४ तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक…

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या रेल्वेगाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धिम्या डाउन मार्गावर वळवल्या जातील. याशिवाय घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

पंकजा मुंडे मोठ्या नेत्या; त्यांच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा- फडणवीस
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक…

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर डाउन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉककालावधीत सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. प्रवाशांचा सोयीसाठी ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

खूपच कमी किंमतीत लाँच झाले दमदार साउंड क्वालिटीचे Earbuds आणि Neckbands

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक…

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी आणि पोईसर पुल संख्या नंबर ६१ च्या री-गर्डरींग दुरुस्तीसाठी शनिवारी – रविवारी कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी दुपारी १. ३० वाजेपर्यत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा बोरीवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तर डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा अंधेरी ते बोरिवली स्थानकाच्या ५ व्या मार्गिकांवर चालविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.

संभाजीराजेंच्या पक्षात जाणार का? शिवेंद्रराजेंचं नेमकं आणि थेट उत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: