रजत पाटीदारच्या अर्धशतकानंतरही आरसीबीच्या संघाची मोठी पडझड, पाहा किती धावा केल्या..


अहमदाबाद : रजत पाटीदारने सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीसाठी सर्वाधिक धावांची खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. रजतेने गेल्या सामन्यात शतक झळकावले होते. त्याने या सामन्यात षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण अखेरच्या षटकांमध्ये आरसीबीला मोठे धक्के बसले आणि त्यांची धावगती मंदावली. पण रजतच्या या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीच्या संघाला राजस्थानपुढे क्वालिफायर-२ या सामन्यात १५८ धावांचे आव्हान ठेवता आले.

राजस्थानच्या संघाने टॉस जिंकला आणि दुसऱ्याच षटकात त्यांनी आरसीबीला पहिला धक्का दिला. विराट कोहलीने आरसीबीला पहिल्याच षटकात दमदार षटकार ठोकत चांगली सुरुवात करून दिली होती. पण दुसऱ्या षटकात राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने यावेळी कोहलीसाठी सापळा रचला आणि त्यामध्ये कोहली अडकल्याचे पाहायला मिळाले. कारण दुसऱ्या षटकात प्रसिधने कोहलीला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकून त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. कोहलीला यावेळी फक्त सात धावा करत आल्या. कोहली बाद झाल्यावर रजत पाटीदार मैदानात आला आणि त्याने दमदार फटकेबाजी केली. रजत फलंदाजी करत असताना फॅफ ड्यु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही बाद झाले. फॅफला यावेळी २५ धावा करता आल्या. फॅफनंतर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलने षटकारासह दमदार सुरुवाती केली होती. पण त्यालाही यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही आणि तो २४ धावांवर आऊट झाला. फॅफ आणि मॅक्सवेल हे दोघेही धडाकेबाज फलंदाज बाद झाले असले तरी पाटीदारने यावेळी एक बाजू लावून धरली होती. पाटीदारने यावेळी षटकार लगावला आणि आपले अर्धशतक साकारले. पाटीदारने गेल्या सामन्यात झुंजार शतक झळकावले होते. त्यामुळे आता पाटीदार नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण अर्धशतकानंतर पाटीदारला जास्त धावा करता आल्या नाहीत. रजतने यावेळी ४२ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. रजत बाद झाल्यावर महिपाल रोमरोरही आठ धावांवर बाद झाला आणि सर्व जबाबदारी दिनेश कार्तिकवर आली. पण कार्तिक यावेळी ६ धावांवर बाद झाला आणि आरसीबीच्या धावसंख्येला खीळ बसली. प्रसिध कृष्णाने यावेळी ४ षटकांत २२ धावा देत तीन बळी मिळवले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: