टी-२०मध्ये झाले वादळी शतक; तुम्ही बटलरची फलंदाजी विसरून जाल


लंडन: भारतात आयपीएलचा थरार अखेरच्या टप्प्यात आला आहे. काल शनिवारी क्वॉलिफायर २ च्या लढतीत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ७ विकेटनी पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलरने हंगामातील चौथे शतक झळकावले. बटलरने ६० चेंडूत ६ षटकार आणि १० चौकारांसह नाबाद १०६ धावा केल्या. बटलरच्या या वादळी खेळीचे सर्वजण कौतुक करत असताना टी-२० क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने अशी खेळी केली आहे ज्यामुळे तुम्ही बटलरचे शतक विसरून जाल.

इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट लीग स्पर्धेत आयरर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंगने बर्मिंघम बीयर्सविरुद्ध खेळताना एका षटकात ५ षटकार आणि १ चौकारांसह ३४ धावा केल्या. बर्मिंघम बीयर्स आणि नोर्थेम्पटनशायरविरुद्ध खेळताना पॉलने ५१ चेंडूत ११९ धावा केल्या. यात ९ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता.

वाचा- Virat Kohli Viral Video: व्हिडिओ शूट करणाऱ्याला लाज वाटली नाही

विशेष म्हणजे पॉलने बर्मिंघम बीयर्सविरुद्ध पदार्पण करणाऱ्या पॉलने फक्त ४६ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकामुळे बर्मिंघम बीयर्सने नोर्थेम्पटनशारयवर १२५ धावांनी मोठा विजय मिळवला.

बर्मिंघम बीयर्सच्या डावात १३व्या षटकात पॉलने जेम्स सेल्सची धुलाई केली. त्याने ६ चेंडूत ३४ धावा केल्या. पहिल्या पाच चेंडूवर पाच षटकार मारल्यानंतर अखेरच्या चेंडूवर षटकार मारून त्याला सहावा षटकार मारण्याची संधी होती. पण अखेरच्या चेंडूवर चौकार गेला. यामुळे सहा चेंडूवर सहा षटकार मारण्याचा विक्रम त्याला करता आला नाही. पॉलने केलेल्या ११९ धावांपैकी ९६ धावा या चौकार आणि षटकारातून आल्या होत्या.

वाचा- स्वत:च्या चुकीने बाद झाला आणि राग काढला अश्विनवर, पाहा व्हिडिओ

वाचा- जोस बटलर आता फायनलमध्ये मोडू शकतो हे मोठे विक्रम आणि ठरू शकतो मिस्टर आयपीएल…

पावसामुळे ही लढत १६ ओव्हरची करण्यात आली होती. बर्मिंघम बीयर्सने प्रथम फलंदाजी करत ३ बाद २१६ धावांचा डोंगर उभा केला. पॉल सोबत सॅम हॅनने ३२ चेंडूत ६६ धावा केल्या. सॅमने पॉलसोबत ७० चेंडूत १७० धावांची भागिदारी केली. डकवर्थ लुईस नियमानुसार २०६ धावांचा पाठलाग करणाऱ्या नोर्थेम्पटनशायर संघाने १४.३ षटकात सर्वबाद ८१ धावा केल्या. टी-२० ब्लास्टमध्ये धावांचा विचार करता हा सर्वात मोठा विजय ठरला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: