Corona: आठवड्याभरात ३७ लाख नवे रुग्ण समोर, जूनमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढणार – WHO
जूनमध्ये वाढू शकतो ओमिक्रॉनचा धोका
क्वाझुलु-नताल युनिव्हर्सिटी ऑफ डर्बनच्या तज्ज्ञांच्या मते, दक्षिण आफ्रिकेत BA.4 आणि BA.5 मुळे आलेली नवी लाट आता ओसरताना दिसत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतच ओमिक्रॉनचे पहिलं प्रकरण समोर आलं होतं. मात्र, जूनमध्ये ओमिक्रॉनमध्ये वाढ होण्याची भीती आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, Omicron च्या सर्व प्रकारांना ट्रॅक केले जात आहे.
करोनामुळे चीनमधील परिस्थिती अजूनच बिकट होत चालली आहे. तिथे कोट्यवधी लोक या ना त्या आजाराने ग्रस्त आहेत. राजधानी बीजिंगमधील अधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच नाहीतर, तिथे पुन्हा करोनाची चाचणी करण्यावर भर देण्यात येत आहे. शांघायमध्ये लॉकडाऊन कठोर असून इतर शहरांमध्ये अद्याप असे कोणतेही निर्बंध नाहीत. शांघायमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लाखो लोक कडक निर्बंधाखाली राहत आहेत.