IPL Memes: रेकॉर्ड नाही पण स्वप्न तोडलं! बटलरच्या वादळात उडाली RCB, RR फॅन्स उडवतायेत खिल्लीरॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (Royal Challengers Bangalore) हरवून राजस्थान रॉयरलनं (Rajasthan Royals) IPL 2022 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. RCB नं पहिली फलंदाजी करून १५७ धावांचं आव्हान उभं केलं होतं. मात्र जॉस बटरलच्या (Jos Buttler) धडाकेबाज शतकामुळे RR नं हे आव्हान अगदी सहजरित्या पुर्ण केलं. RR नं RCB चा तब्बल ७ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात सर्वांच्या नजरा किंग विराट कोहलीवर (Virat Kohli) होत्या. परंतु तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. ८ चेंडूत ७ धावा करून तो बाद झाला. त्यामुळे RCB चं IPL ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान फॅन्स सध्या RCB ची खिल्ली उडवत आहेत. तर मग पाहूया व्हायरल होणारे काही भन्नाट मीम्स.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: