देशातील १० पैकी एक महिला करते नवऱ्याची धुलाई; समोर आली धक्कादायक आकडेवारी


नवी दिल्ली: राजस्थानमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला स्वत:च्या पतीला बॅटने मारताना दिसते. संबंधित व्हिडिओ अलवरचा असल्याचे समजते. या व्हिडिओतील व्यक्ती अजीत सिंह असून ते सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत. अजित सिंह यांच्या घरातील सीसीटीव्हीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पत्नी त्यांना बॅटने मारत असल्याचे दिसते.

अजीत सिंह यांची ९ वर्षापूर्वी सोनीपत येथील सुमन यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले. पण त्यानंतर नाते बिघडू लागले. पत्नीकडून वारंवार त्यांना मारहाण केली जाऊ लागली. घरगुती हिंसाचार म्हटले की आधी महिला समोर येतात. पण अजित सिंह सारखे अनेक पुरुष देखील घरगुती हिंसाचाराला सामोरे जात असतात.

वाचा- बिनविरोध महिलांची ग्रामपंचायत झाल्यास मिळणार १५ लाख रुपये; ‘या’ राज्याचा मोठा निर्णय

नॅशनल फॅमेली हेल्थ सर्व्हे ५ च्या आकडेवारीनुसार १८ ते ४९ वयोगटातील १० टक्के महिला अशा आहेत ज्यांनी कधी ना कधी पतीला मारहाण केली आहे. या महिला अशा आहेत ज्यांच्या पतीने कधीच त्यांच्यावर हात उचलला नाही. याचाच अर्थ कोणतेही कारण नसताना १० टक्के महिलांनी पतीला मारहाण केली आहे.

वाचा- Corona: आठवड्याभरात ३७ लाख नवे रुग्ण समोर, जूनमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढणार – WHO

या सर्व्हेत असे देखील समोर आले आहे की, ११ टक्के महिलांनी गेल्या एका वर्षात पतीला मारहाण केली. वाढणाऱ्या वयासोबत पतीला मारहाण करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. १८ ते १९ वयोगटात १ टक्केपेक्षा कमी महिला मारहाण करतात. तर २० ते २४ वयोगटातील ३ टक्के महिला, २५ ते २९ वयोगटातील ३.४ टक्के महिला, ३० ते ३९ वयोगटातील ३.९ टक्के महिला, ४० ते ४९ टक्के महिला ३.७ टक्के महिलांनी पतीला मारहाण केली आहे.

धक्कादायक म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिला अधिक मारहाण करतात. पतीला मारहाण करण्याचे शहरातील प्रमाण ३.३ टक्के आहे तर ग्रामीण भागात हेच प्रमाण ३.७ टक्के आहे.

वाचा-गुगल अडचणीत; ‘या’ कारणामुळे ब्रिटनमध्ये सुरू झाली चौकशी

महिलांना मारहाण झाली तर त्यांच्यासाठी कायदा आहे. पण पुरुषांसाठी असा कोणताही कायदा नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने एका निर्णयात याचा उल्लेख केला होता.

काय करू शकतात पुरुष

हिंदू विवाह कायदा १३ नुसार घटस्फोट मागू शकतो. या कलमानुसार अर्ज करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर क्रुरता आणि शारीरीक किंवा मानसिक हिंसाचाराच्या विरोधात अर्ज करू शकते. या शिवाय भारतीय दंडविधान संहिता कलम १२० बी, कलम १९१, कलम ५०६ आणि सीआरपीसी कलम २२७ नुसार कायदेशीर कारवाई करू शकतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: