आई आजारी आहे, पण…; राजस्थानच्या या पट्ठ्याने हिंमत हारली नाही, रॉयल चॅलेंजर्सचं कंबरडं मोडलं


IPL 2022 Qualifier 2: मुंबई : राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी रात्री आयपीएल २०२२ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. राजस्थान रॉयल्स १४ वर्षांच्या वनवासानंतर फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे. संघाच्या या धमाकेदार विजयात जॉस बटलरच्या शतकाने महत्त्वाची भूमिका बजावलीच पण संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांनाही जाते. आरसीबीच्या भक्कम फलंदाजीतील राजस्थानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत त्यांना १५७ धावांत रोखले. यादरम्यान प्रसिद्ध कृष्णाने ४ षटकांत २२ धावा देत तीन बळी घेतले, परंतु ओबेद मॅकॉयची कामगिरीच्या लक्षवेधी ठरली. वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजाने २३ धावांत तीन बळी घेतले.

वाचा – गुजरात टायटन्स आणि चॅम्पियनशिपच्या मार्गात मोठा अडथळा, जेतेपदासाठी बदलावा लागेल इतिहास

सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकर यांनी मॅकॉयच्या आईची तब्येत खराब असल्याचे उघड केले. परंतु असे असूनही खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. संगकारा म्हणाला, “मॅककॉयची आई वेस्ट इंडिजमध्ये खूप आजारी होती आणि त्याला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला आणि तरीही आजची रात्र एकाग्र व विलक्षण होती. मॅककॉयची आई आता बरी होत आहे.” आता २९ मे रोजी राजस्थानची हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सशी जेतेपदाची लढत होईल. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या अंतिम सामन्यात पुन्हा गुजरात बाजू मारणार की राजस्थान तख्तापालट करणार हे पाहणे मनोरंजक असेल.

वाचा – गुजरात टायटन्स आणि चॅम्पियनशिपच्या मार्गात मोठा अडथळा, जेतेपदासाठी बदलावा लागेल इतिहास

दरम्यान आयपीएल २०२२ मधील राजस्थान रॉयल्सच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर संघाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. जोस बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे, तर कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिमरॉन हेटमायर त्याला मोलाची साथ देत आहेत. तसेच यावेळी राजस्थानचे बॉलिंग युनिट खूपच मजबूत आहे. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्ण आहे, तर युझवेंद्र चहल आणि आर अश्विन फिरकी विभागात आक्रमक भूमिका बजावत आहेत. राजस्थान लीग टप्प्यातील ९ सामने जिंकून आणि पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवत प्ले ऑफसाठी पात्र ठरले होते. अशा परिस्थितीत त्यांना क्वालिफायर १ मध्ये पराभूत होऊनही त्यांना अंतिम सामना खेळण्याची आणखी एक संधी मिळाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: