बिनविरोध महिलांची ग्रामपंचायत झाल्यास मिळणार १५ लाख रुपये; ‘या’ राज्याचा मोठा निर्णय


भोपाळ: ग्रामपंचायत निवडणुकीची आचासंहिता लागू होण्याच्या एक तास आधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ग्रामपंचायतींसाठी एक कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली. यात बिनविरोध निवड, फक्त महिला सदस्य असलेल्या ग्रामपंचायत, विकास कामं, पायाभूत सुविधा अशा ग्रामपंचायतींना ५ लाख ते ५० हजार रुपयांपर्यंत बक्षिस दिले जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा साडे अकरावाजता केली. त्याच्या आधी सकाळी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून ही घोषणा केली. मध्य प्रदेशमध्ये कोणत्याही ग्राम पंचायतीत जर सरपंचाची बिनविरोध निवड झाली तर ५ लाख रुपये, दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली तर ७ लाख, सरपंचासह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर ७ लाख, सर्व सदस्य महिला असतील तर १२ लाख, सर्व महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाल्यास १५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

वाचा- ‘शरद पवारांचा ‘जुम्मा’ असल्याने Non-Veg खाल्ल्याचं सांगून दगडूशेठच्या मंदिरात जाणं टाळलं’

या शिवाय विकास काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना ५० लाख, २५ लाख आणि १० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २१ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. या शिवाय ज्या मंदिरांकडे ५ एकर जागा आहे त्यांना २ जार ५०० रुपये, ५ ते १० एकर जागा आहे त्यांना प्रती महिना २ हजार रुपये दिले जातील. ज्यांच्याकडे १० एकरपेक्षा अधिक जागा आहे त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. तर ज्य मंदिरांकडे जागा नाही त्यांना महिन्याला ५ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

वाचा- नवनीत राणा प्रकरणात महाराष्ट्रातील ४ बडे अधिकारी अडचणीत? दिल्लीत वेगवान हालचालीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: