यूक्रेनला शस्त्र पाठवून मर्यादा ओलांडू नका, रशियाची अमेरिकेला धमकी


कीव्ह : रशिया (Russia )आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध ९४ वा दिवस असूनही संपलेलं नाही. रशियानं यूक्रेनविरुद्ध नाटोच्या मुद्यावर आक्रमण सुरु केलं होतं. पुतीन यांच्या सैन्याकडून यूक्रेनवरील हल्ले वाढवण्यात आले आहेत. अमेरिका पुढील आठवड्यात यूक्रेनला शस्त्र पुरवठा करण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून यूक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र, राकेट लाँचर दिली जाण्याची शक्यता आहे. रशियन माध्यमांनी यावरुन अमेरिकेला धमकी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच पॉवरचा दुरुपयोग, संकटमोचनने त्यांना सद्बुद्धी द्यावी – नवनीत राणा
रशियन माध्यमातील ओल्गा स्केबेयवा यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिका यूक्रेनला पुढील आठवड्यात शस्त्र पुरवठा करणार आहे. त्यामध्ये लाँग रेंज मिसाइल आणि रणगाडे पुरवले जाण्याची शक्यता आहे. रशियानं डोनबासमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले आहेत. यूक्रेनच्या सैन्याला यामुळं माघार घ्यावी लागली आहे. यूक्रेननं अमेरिका आणि नाटोकडे मागणी केली आहे.

रिझर्व्ह बँंकेचे डिजिटल चलन; लवकरच अहवाल सादर केला जाणार

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाची तीव्रता आणखी वाढल्यास अमेरिकेची भूमिका काय असेल, हा देखील प्रश्न आहे. अमेरिकेनं दिलेली शस्त्र यूक्रेन त्यांच्या देशात असलेल्या रशियन सैन्याविरोधात वापरणार की रशियावर हल्ला करणार हे स्पष्ट झालेलं नाही.

अमेरिका यूक्रेनला पुढील आठवड्यात शस्त्र पाठवण्याची शक्यता आहे. M२७० MLRS आणि M१४२ HIMARS ही शस्त्र रॉकेट लाँचर आहेत, त्यांची क्षमता ३०० किलोमीटर आहे. अमेरिकेनं यूक्रेनला यापूर्वी M७७७ होवित्जर देखील दिलं आहे. याची क्षमता २५ कि.मी. पर्यंत मारा करण्याची आहे. अमेरिकेनं यूक्रेनला ५० किमी क्षमतेपर्यंतची शस्त्र द्यावीत, अशी भूमिका अमेरिकन अधिकाऱ्यांची आहे.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. रशियानं ४० शहरांमध्ये जोरदार हल्ले सुरु केले असल्याचं यूक्रेननं म्हटलं आहे. सर्वाधिक हल्ले डोनबासमध्ये करण्यात येत आहेत. रशियानं यूक्रेनमधील मारियूपोलवर ताबा मिळवलेला आहे. त्यानंतर रशियानं डोनबासकडे मोर्चा वळवला आहे. रशियाकडून डोनबासमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात येत आहेत, त्यामुळं स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दुसरीकडे फिनलँड आणि स्वीडननं नाटोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

‘अनिल परबांना एसटी कर्मचाऱ्यांचा शाप लागला आहे’; रवी राणांची टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: