जोस बटलर माझा दुसरा नवरा; क्रिकेटपटूच्या पत्नीच्या वक्तव्याने…


अहमदाबाद: राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये पोहोचवणारा शतकवीर जोस बटरल सध्या स्टार झालाय. बटरलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्धच्या लढतीत हंगामातील चौथे शतक झळकावले. बटलरने आतापर्यंत १६ सामन्यात ४ शतक आणि ४ अर्धशतकासह ८२४ धावा केल्या आहेत. अशात बटलर संदर्भात असे वक्तव्य समोर येत आहे ज्याने सर्वांना धक्का बसलाय.

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू रासी वान डर डुसेनची पत्नी लाराने बटलर संदर्भात असे वक्तव्य केले आहे, ज्याने सर्वांना धक्कादायक वक्तव्य केलेय. लाराने म्हटले आहे की, जोस बटरलला मी माझा दुसरा पती म्हणून स्विकारले आहे. डुसेन देखील राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय.

वाचा- टी-२०मध्ये झाले वादळी शतक; तुम्ही बटलरची फलंदाजी विसरून जाल

अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नीप्रमाणे लारा देखील स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी येते. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोबत लारा नेहमी दिसते. काल क्वॉलिफायर २च्या लढतीनंतर गंमतीने लारा म्हणाली की, मी जोस बटलरला दुसरा पती म्हणून स्विकारले आहे. तो जेव्हा षटकार मारतो तेव्हा कॅमेरा आमच्याकडे येतो. यातील दुसरा गंमतीचा भाग असा की कॅमेरा जेव्हा जेव्हा व्हीआयपी बॉक्समध्ये जातो तेव्हा लारा कॅमेऱ्यावर दिसते आणि चाहत्यांना वाटते की ती बटलरची पत्नी आहे.

यावर लाराने हे देखील स्पष्ट केली की बटलर माझा पती नाही. मी रासी वान डर डुसेनी पत्नी आहे, ना की बटलरची. बटलर जेव्हा जेव्हा मोठे शॉट खेळतो तेव्हा तेव्हा कॅमेरा माझ्यावर येतो. यामुळे लोकांचा गैरसमज झालाय.

वाचा- आई आजारी आहे, पण…; राजस्थानच्या या पट्ठ्याने हिंमत हारली नाही, रॉयल चॅलेंजर्सचं कंबरडं मोडलं

राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टवर बोलताना लारा म्हणाली, मला वाटते की जोसला दुसरा पती म्हणून स्विकारले आहे. मला लुईस या नावाने ओळखले जाते. त्यांच्या (बटलर) पत्नीचे नाव असावे. मी त्यांना कधी भेटलो नाही. पण हे गोष्ट विचित्र वाटते. लोकांना वाटते की मी जोसची पत्नी आहे. मी आणि धनश्री स्टेडियममध्ये शांत बसू शकत नाही. आम्ही खुप जल्लोष करतो आणि संघाला चिअर करतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: