दोन महिन्यात पाच हजारांनी स्वस्त; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर


मुंबई : अमेरिकेतील बेरोजगारी आणि महागाई, फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ, रशिया-युक्रेन युद्ध, बॉंड यिल्डमध्ये सुधारणा, डॉलरचे मूल्य वधारणे यामुळे जागतिक पातळीवर मागील दोन महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्याचे पडसाद भारतात उमटले आहेत. भारतात दोन महिन्यात सोनं ५,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्याचे भाव वाढतील का? जाणून घ्या कशी राहील सोन्याची पुढील वाटचाल
रशिया आणि युक्रेन युद्धाला तोंड फुटताच जगभरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सोने दरात प्रंचड वाढ झाली होती. मार्च २०२२ मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ५५,६०० रुपयांवर गेला होता. तो आता जवळपास ५,००० रुपयांनी कमी झाला आहे.

टेस्लाचे भारतात कधी उत्पादन सुरु होणार; एलन मस्क यांनी ट्विट करुन दिले हे उत्तर म्हणाले…
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी बाजार बंद होताना दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ झाली होती. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,९५८ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात ५७ रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६२,१७९ रुपयांवर बंद झाला. त्यात ३८६ रुपयांची वाढ झाली होती. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार शुक्रवारी सोन्याचा भाव ५०,९४५ रुपये इतका होता. एक किलो चांदीचा भाव ६१,६०५ रुपये इतका होता.

महागाईने गृहस्वप्नाला तडा! देशातील बड्या सिमेंट उत्पादक कंपनीची भरमसाठ दरवाढ
Goodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी २८ मे २०२२ रोजी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,७५० रुपये इतका आहे. आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२,०९० रुपये इतका आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,७५० रुपये इतका असून २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५०,०९० रुपये इतका वाढला आहे.

वाहनाधारकांनो लक्ष द्या; ३१ मे रोजी पेट्रोल पंपांवर होईल खडखडाट कारण…
आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७,८०० रुपये इतका असून चेन्नईतील आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२,१५० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,७५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२,०९० रुपये इतका वाढला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पुढील आठवड्यात ‘पीएम किसान’चा लाभ, अशी तपासा यादी
आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव मात्र वधारला आहे. स्पॉट गोल्डचा भाव १,८५४ डॉलर प्रती औंस इतका वाढला. त्यात ०.२ टक्के वाढ झाली. चांदीचा भाव मात्र ०.२ टक्क्यांनी कमी झाला आणि तो २१.९५ डॉलर झाला. नजीकच्या काळात सोन्याचा भाव १,८४० डॉलर ते १,८७० डॉलरच्या दरम्यान राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सोन्याची मागील २०० दिवासांची सरासरी किंमत १,८३९ डॉलर इतकी खाली आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: