IPL चे फायनलिस्ट होणार मालामाल, जाणून घ्या कोणत्या टीमला मिळणार किती रककम


IPL 2022 Prize Money: मुंबई : आयपीएल २०२२ च्या क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा आरसीबी खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले. मात्र, पराभव होऊनही या संघावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हंगाम संपवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेत्रदीपक आयपीएल हंगामासाठी आरसीबीला ७ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या खात्यात ६.५० कोटी रुपये जमा होतील.

वाचा – बेंगळुरूच्या पराभवाचा सर्वात मोठा दोषी ठरला हा दिग्गज; न धावा केल्या आणि बटलरचा झेलही सोडला

हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल १५ चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला २० कोटी तर उपविजेत्या संघाला १३ कोटी मिळतील. याशिवाय पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस रक्कम दिली जाईल. दुसरीकडे, उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तथापि लीग टप्प्यात बाहेर पडलेल्या संघांना किती रक्कम मिळेल याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

वाचा – जोस बटलर राजस्थानसाठी ठरला हुकमी एक्का, ऑरेंज कॅपसह नोंदवले महत्वाचे विक्रम

२००८ मध्ये विजेत्या संघाला किती मिळाले
आयपीएलचा पहिला सीझन २००८ मध्ये खेळला गेला, त्यादरम्यान शेन वॉर्नच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले. त्यावेळी राजस्थान संघाला ४.८ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिल्लई होती. त्यांनतर ही लीग जसजशी जगभर लोकप्रिय होत गेली, तसतशी बक्षिसांची रक्कमही वाढत गेली. आणि आज जेतेपद पटकावणाऱ्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: