शाहू घराण्यानं सत्याची कास सोडली नसल्याचं सिद्ध, संजय राऊतांचं वक्तव्य


कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवार देखील उपस्थित होते. मी त्यांचं निवेदन ऐकलं, कोल्हापूरच्या मातीमध्ये सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्यानं सत्याची कास सोडली नाही, हे देखील सिद्ध झालं, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने कधीही कुणाची फसवणूक केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जी काल विधानं केलेली आहेत, की आम्ही ठरवून कोंडी केली ती विधान खोटं होतं हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विधानातून स्पष्ट झालं, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणणं बरोबर नाही : श्रीमंत शाहू छत्रपती
शाहू महाराजांचा अनुभव दांडगा आहे. शाहू महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा निकटचा स्नेह राहिलेलं आहे. ठाकरे घराणं आणि राजर्षी शाहू महाराज यांचं घराणं यांचं नातं कसं आहे हे समोर आलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सगळ्यात आधी फडणवीस-संभाजीराजे भेट; त्यानंतर हे सगळं घडलं; शाहू महाराजांचा
काही लोकांनी महाराष्ट्रात यानिमित्तानं पेटवापेटवीची भाषा केली. शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा केली. शिवसेनेनं या प्रकरणात खालच्या पातळीवरील राजकारण केलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

कोणीतरी संभाजीराजांना पुढं करुन महाराष्ट्रात वेगळा डाव खेळण्याचा प्रयत्न करत होतं. तो डाव नव्हता ते कपट होतं. ते कपट काय होतं ते स्वत: छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं. आजही महाराष्ट्रही शाहू घराण्यापुढं झुकतो याचं ते कारण आहे. महाराष्ट्रावर ज्या ज्यावेळी संकट आलं त्यावेळी शाहू घराण्यानं भूमिका घेतली आहे. मी शाहू महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

श्रीमंत शाहू महाराज काय म्हणाले?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, असं म्हणणं योग्य नाही, अशी शाहू महाराज म्हणाले. आतापर्यंत सगळ्यांनीच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. सेनेने उमेदवारी दिली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान केला असं म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात झालेला ड्राफ्ट कच्चा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यूटर्न घेतला असं म्हणता येणार नाही”, असं वक्तव्य संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांनी केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: