भ्रष्ट मंत्र्याला हाकलल्यानंतर पंजाब सरकारचं मोठं पाऊल, राजकारण्यांसह ४२४ जणांची सुरक्षा काढली


चंदीगढ : आम आदमी पार्टीची पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर भगवंत मान सरकारनं धक्कातंत्र सुरु ठेवलं आहे. पंजाब पोलिसांनी राजकीय, धार्मिक क्षेत्रातील ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारनं सुरक्षा काढलेल्या लोकांच्या यादीत माजी आमदार, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दोन्ही डोस, बुस्टरही घेतला, तरी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण, महाराष्ट्राची चिंता वाढली

पंजाब पोलिसांनी सुरक्षा काढलेल्यांमध्ये भटिंडा आणि अकाल तख्त येथील जाथेदार जियानी हरप्रीत सिंग यांची सुरक्षा काढली आहे. जियानी रघबीर सिंघ यांची सुरक्षा देखील काढण्यात आली आहे. डेरा राधास्वामी सत्संग बियास, डेरा दिव्या ज्योती जागृती संस्थान, नूर महाल, शाही इमाम पंजाब, मोहम्मद उस्मान लुथियान्वी यांची देखील सुरक्षा हटवण्यात आली आहे. शिरोमणी अकाली दलाचे मजिठा येथील आमदार गनवी कौर मजिठिया, जालंधर छावणी मधील आमदार प्रगत सिंघ, आपचे लुधियाना उत्तर चे आमदार मदनलाल बग्गा यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे.

माध्यमांचे एका रांगेत कॅमेरे पाहून राज ठाकरे म्हणाले, ऑस्ट्रेलियाने अशीच फिल्डिंग लावली होती!
काँग्रेसचे माजी आमदार कुलजीत सिंह नाग्रा, बलविंदर सिंह लद्दी, हरमिंदर गिल, मदनलाल जहालपूर, सुरजीत धिमन, हरदियाल कंबोज, सुखपाल भुल्लर यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांची देखील सुरक्षा काढण्यात आली आहे. दिनेश बाबू, शरणजित सिंघ धिल्लोन, कंवरजीत सिंह, गुरुप्रताप सिंह वडाला यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

आपचे माजी आमदार कंवर संधू, जगतार सिंघ जग्गा यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. भाजप नेते माजी आमदार फतेहजंग बाजवा, माजी मंत्री तिक्षाण सूद, भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल सरीन यांची सुरक्षा काढली आहे.

राजकीय नेते, धार्मिक संस्थांमधील प्रमुख यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची देखील सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळं तात्पुरत्या स्वपरुपात सुरक्षा काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खलिस्तानी समर्थकांच्या कारवाया देखील वाढल्या होत्या.

अखेर फुले वाड्यावरील ‘तो’ बोर्ड समता परिषदेने हटविला, नामफलकावरुन पुण्यात संतापSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: