१२ वर्ष मुख्यमंत्र्यांच्या पगाराचा रुपया घेतला नाही, मी मजनू आहे का?, पाकच्या पंतप्रधानांचा सवाल


लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर १६ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. शाहबाज शरीफ त्या प्रकरणी कोर्टासमोर उपस्थित राहिले होते. पंजाबचे मुख्यमंत्री असताना मी पगार म्हणून एक रुपया देखील घेतला नाही, मी मुर्ख होतो, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री असताना पगार म्हणून एक रुपया देखील न घेता माझ्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं ते म्हणाले. इमरान खान पंतप्रधान असताना शाहबाज शरीफ यांच्या विरुद्ध एफआयएनं गुन्हा दाखल केला होता. शाहबाज शरीफ यांच्या दोन मुलांविरोधात देखील भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमजा आणि सुलेमान यांच्या विरोधात नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहबाज शरीफ यांचा मुलगा हमजा हा सध्या पंजाब प्रांताचा मुख्यमंत्री आहे. तर, दुसरा मुलगा सुलेमान फरार असून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. एफआयएनं शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मुलांवर २८ बेनामी खात्यातून काळे पैसे पांढरे केल्याआरोप आहे. २००८ ते २०१८ मध्ये १४ कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
BIG BREAKING: सावधान! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव, पुण्यात ७ रुग्ण

शाहबाज शरीफ यांनी न्यायालयात मी साडे बारा वर्षात पंजाबचा मुख्यमंत्री असताना पगार म्हणून देखील पैसे घेतले नाहीत, असं म्हटलं. माझ्यावर आर्थिक अफरातफरीचे आरोप लावण्यात आले आहेत, असं ते म्हणाले. शाहबाज शरीफ यांनी त्यांना अल्लानं पंतप्रधान केल्याचं म्हटलं आहे. मी माझ्या कायदेशीर अधिकाराचा वापर, पगाराचा देखील लाभ घेतला नव्हता, असं शाहबाज शरीफ म्हणाले.

शाहबाज शरीफ ११९७ मध्ये पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. मात्र, १९९९ मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांचं सरकार बर्खास्त केल्यानंतर शाहबाज शरीफ त्यांच्या कुटुंबासह २००७ पर्यंत सौदी अरेबियात होते.२००८ मध्ये ते पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. २०१३ मध्ये देखील त्यांचा विजय झाला होता.
मी म्हणतो तेच सत्य, वडिलांच्या गौप्यस्फोटावर मी काही बोलणार नाही, संभाजीराजेंचं ट्विट

शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या एका निर्णयामुळं कुटुंबाचं २ अब्ज रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. ज्यावेळी माझ्या मुलाचं इथेनॉल संयत्र सुरु होत होते त्यावेळी आम्ही इथेनॉलवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आमच्या कुटुंबाचं वार्षिक ८० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. शाहबाज शरीफ यांच्या वकिलांनी इमरान खान यांनी राजकीय सूडबुद्धीनं आरोप केले असल्याचं म्हटलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: